Share

महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला सल्ला; म्हणाले, वसंत तु…

vasant more & raj thakre

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच त्यांच्या या भूमिकेला भाजपही पाठिंबा देताना दिसून येत आहे. (raj thackeray advice to vasant more)

असे असताना मनसेचेच काही नेते राज ठाकरेंच्या या भूमिकेवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातलेच एक नाव म्हणजे वसंत मोरे. वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांच्या या भूमिकेमुळे ते पक्ष सोडून जाणार की काय अशी चर्चाही होत होती. पण त्यांनी आपण मनसेतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.

शनिवारच्या महाआरतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. शनिवारी कात्रजमध्ये त्यांच्या ऑफिससमोरच्या हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते. राज ठाकरे या आरतीला उपस्थित राहतील अशी चर्चा होती. पण राज ठाकरेंसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही या आरतीला गैरहजेरी लावली.

वसंत मोरेंनी आयोजित केलेल्या या महाआरतीला मनसे नेते उपस्थित नसल्यामुळे चर्चांना उधाण आले होते. तसेच राज ठाकरे नाराज असल्याच्या चर्चाही होत होत्या. पण आता राज ठाकरेंनी वसंत मोरेंना एक सल्ला दिल्याचे समोर आले आहे. स्वत: वसंत मोरेंनीच याबद्दल सांगितले आहे.

वसंत मोरेंनी आज राज ठाकरेंनी भेट घेतली आहे. राज ठाकरेंच्या पुण्यातील निवासस्थानीच त्यांनी भेट झाली. या भेटीनंतर वसंत मोरेंनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंशी काय चर्चा झाली हे सांगितले आहे. मला मिसळ महोत्मव घेण्याचा सल्ला राज ठाकरेंनी दिल्याचे वसंत मोरेंनी म्हटले आहे.

राजसाहेब ठाकरे काल पुण्यात येणार असल्याचे मला माहित नव्हतं. माध्यमांमुळेच मला ती माहिती मिळाली. पण त्यापूर्वीच मी महाआरतीचं आयोजन केलं होतं. त्याबद्दल राज ठाकरेंना मी मेसेज करुन कळवलं होतं, असे वसंत मोरेंनी म्हटले आहे.

आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींबद्दल चर्चा झाली. साहेबांनी महाआरतीचं कौतूक केलं आहे. तसेच काल साहेबांना येता आलं नाही. पण वसंत तु मिसळ महोत्सव घे, मी येतो, असा सल्ला त्यांनी मला दिला आहे. तसेच एका कार्यक्रमाबद्दल त्यांना सांगितलं आहे. साहेब निश्चितच येतील, असेही वसंत मोरेंनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मातृदिनानिमित्त आईचे उत्तम उदाहरण! लहान वयात पतीचा मृत्यू, शेती करून मुलांना बनवले अधिकारी
प्रसिद्ध गायिकेवर झाला सामूहिक बलात्काराचा प्रयत्न, म्हणाली, मला गाण्यासाठी बोलावलं आणि…
लॉकअपचा विजेता मुन्नवर फारुकीचे आयुष्य होते वादग्रस्त, कधी रडला तर कधी हसला

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now