Share

“आज कोणती सरकारी कंपनी विकू…” राहूल गांधींची नरेंद्र मोदींवर बोचरी टीका

rahul gandhi narendra modi

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीना पाहून काँग्रेस नेते राहूल गांधी सतत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसतात. तसेच रोजगार, वाढती महागाई, सर्वसामान्य जनतेचे हाल, बेरोजगारीच्या मुद्द्यावर तर राहूल गांधी केंद्र सरकारवर खार खाऊन असतात. आता पुन्हा एकदा राहूल गांधीनी इंधन दरवाढीवरुन मोदींवर निशाणा साधला आहे.

राहूल गांधीनी ट्विट करत Daily To Do List ची एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी, “पंतप्रधानांची Daily To Do List.. १. पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर किती वाढवू, २. लोकांची खर्चावर चर्चा कशी थांबवू, ३.तरुणांना रोजगारांची पोकळ स्वप्न कशी दाखवू ४. आज कोणती सरकारी कंपनी विकू, ५. शेतकऱ्यांना अधिक लाचार कसं करू,” असे म्हटले आहे.

या ट्विटमधून त्यांनी थेट पंतप्रधानांनी केलेल्या कामाचे आणि आश्वासानाचे मुद्दे मांडले आहे. राहूल गांधीच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राहूल गांधीचे हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. यापूर्वीही त्यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधांना सुनावले होते.

भारतात सतत इंधन दरवाढ होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांचे आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडले आहे. यात सर्वसामान्यांनी जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या इंधन दरवाढीच्या विषयावरून राजकिय वर्तुळातही टीकाटिपणी होताना दिसत आहे.

यात विरोधी पक्षनेते केंद्रावर टीका करताना दिसत आहेत. लवकरात लवकर इंधनाचे दर कमी करण्यात यावेत अशी मागणी विरोधी नेत्यांनी केली आहे. सध्या जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव 108 डॉलर प्रति बॅरल झाली आहे.

यामध्ये 22 मार्चपासून देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढ झाली आहे. गेल्या ९ दिवसांमध्ये ८ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी डोक्यालाच हात लावला आहे.

महत्वाच्या बातम्या
आता हद्दच झाली! कपड्यांशिवाय अंगावर फक्त फोटो चिटकवून उर्फी जावेदने केला डान्स, पहा व्हिडीओ
गुढीपाडव्याला मास्कमुक्ती होणार?; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी केले मोठे विधान
कोरोनाचा हाहाकार! वुहाननंतर शांघाईमध्ये सर्वात मोठे लॉकडाऊन, माणसांसोबत प्राण्यांवरही लावले निर्बंध
लक्झरी कार सोडून मुंबई लोकलने प्रवास करत होता ‘हा’ अभिनेता, साधेपणाचे लोकांनी केले कौतुक

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now