उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकीचा गोंधळ संपला आहे. या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले आहे. या राज्यांमध्ये पंजाब वगळता सगळीकडे भाजप सरकार निवडून आले आहे. या निवडणूकीत काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसला एकाही राज्यात सत्ता मिळवता आली नाहीये. (rahul gandhi sonia gandhi resign)
विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील रणनितींबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) रविवारी बैठक होणार आहे. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी दुपारी ४ वाजता सीडब्ल्यूसीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, सोनिया गांधी, राहूल गांधी आणि प्रियंका गांधी या बैठकीत राजीनामा देणार अशी चर्चा होत होती. आता काँग्रेसने याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, वरिष्ठ नेत्यांच्या राजीनाम्याची बातमी खोटी आहे. सुरजेवाला म्हणाले की, कथित राजीनाम्याचे वृत्त, अज्ञात स्त्रोतांच्या आधारे पसरत असून ते पूर्णपणे खोटे आहे.
काँग्रेसची सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था CWC ची बैठक अशा वेळी होणार आहे, जेव्हा काँग्रेसला पंजाबमध्ये सत्ता गमवावी लागली आहे. तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या निवडणूकींमध्येही काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
काँग्रेसला उत्तर प्रदेशातील ४०३ विधानसभा जागांपैकी २.३३ टक्के मतांसह फक्त २ जागा जिंकता आल्या आणि त्यांच्या बहुतांश उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाले. उत्तर प्रदेशच्या प्रभारी AICC सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करूनही पक्षाला कोणतेही यश मिळाले नाही.
२०१९ च्या निवडणुकीत पक्षाच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून पुन्हा पक्षाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी सुद्धा ऑगस्ट २०२० मध्ये पक्षाच्या नेत्यांच्या ‘जी-२३’ च्या गटाने उघड बंडानंतर सोनिया गांधींना पद सोडण्याची मागणी केली जात होती, पण सीडब्ल्यूसीने त्यांचे पद तसेच ठेवले होते.
महत्वाच्या बातम्या-
समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यायचे असेल तर निम्मे पैसे द्या; दानवेंची मागणी
“तो माझा नाही, मोदीजींचा मुलगा आहे”; युक्रेनमधून विद्यार्थी परतल्यावर वडिलांची भावूक प्रतिक्रिया
३०० एकरात पुण्यात उभारणार इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प; अजित पवारांची मोठी घोषणा