Share

“लवकरच आपला देश द्वेष आणि रागाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असेल”

modi-rahul-gandhi

नुकतीच जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर झाली आहे. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं. यंदाच्या वर्षी अर्थात २०२२ ची यादी तयार करताना एकूण १४६ देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळाला आहे.

जगभरातील 150 देशांमधून नागरिकांचे चांगले राहणीमान, जीडीपी, सरासरी आयुर्मान आणि वैयक्तिक पातळीवर असलेले समाधान याची माहिती वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टच्या माध्यमातून प्रसिध्द करण्यात येते. त्यात यावर्षीचा आनंदी देशांचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. त्यामध्ये भारत 146 देशांच्या यादीत तळाला आहे.

तर फिनलॅंडने प्रथम क्रमांक राखला आहे. आता या यादीवरून राजकरण चांगलेच तापले आहे. याचाच धागा पकडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लवकरच आपला देश द्वेश आणि रागाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असेल, अशी खरमरीत टीका राहुल गांधी यांनी केली.

https://twitter.com/RahulGandhi/status/1505144455820632070?s=20&t=-GvlD-OcYZjmrI_quJQT5g

तसेच राहुल गांधी यांनी ट्विट करत संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या वार्षिक आनंद निर्देशांकाची यादी शेअर केली आहे. “हंगर रैंक101, स्वातंत्र्य क्रमांक 119 आणि आनंदी देशांच्या यादीत भारत 136 व्या स्थानी आहे. परंतु, आम्ही लवकरच द्वेश आणि रागाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असू शकतो” असं त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी १११ तर गेल्या वर्षी भारताचा ११७वा क्रमांक होता. यंदा तो आणखी घसरून ११८वा आला आहे. यंदाच्या सर्वेक्षणात भारतीयांनी पुन्हा घसरगुंडी सुरू ठेवल्याचे दिसते. मुळे आनंदी देशांच्या यादीत भारत दुःखी आहे का? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

दरवर्षी जगभरातील 150 देशांमधून नागरिकांचे चांगले राहणीमान, जीडीपी, सरासरी आयुर्मान आणि वैयक्तिक पातळीवर असलेले समाधान याची माहिती वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टच्या माध्यमातून प्रसिध्द करण्यात येते. त्यात 2022 चा आनंदी देशांचा रिपोर्ट जाहीर झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
कपिल शर्मावर आली फुड डिलिव्हरी बॉयचे काम करण्याची वेळ? ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का
संभाजी भिडेंवर टीका करताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली; अजमल कसाबशी केली तुलना
संबंध ठेव नाहीतर संघातून काढेल म्हणत खेळाडूचे केले लैंगिक शोषण, अकोल्याच्या कोचला जन्मठेप
बापाने डोक्यात मुसळी मारुन आईला संपवलं; पण ‘तो’ ना रडला ना हरला, शेवटी त्याने आयुष्य जिंकूनच दाखवलं

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now