Share

गुजरात निवडणुकीत केला जाऊ शकतो भाजपचा पराभव; राहुल गांधींनी आखला मास्टर प्लॅन

rahul gandhi

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर रविवारी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात निवडणुकीतील पराभवाच्या कारणांवर विचारविनिमय करण्यात आला. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत काँग्रेस संघटना आणखी मजबूत करण्यावर एकमत झाले.

तब्बल पाच तास काँग्रेसच्या दिग्गजांनी या बैठकीत विचारविनिमय करण्यात केले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढे जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच निवडणुकीतील पराभवाबरोबरच पक्षापुढील आव्हाने काय आहेत, याचीही चर्चा झाली.

CWC बैठकीत राहुल गांधी म्हणाले की, (डेमोग्राफिक प्रोफाइल ऑफ द कंट्री) देशाच्या लोकसंख्याशास्त्राचा उल्लेख करून ते म्हणाले, पक्षाने अशा प्रकारे पुढे जायला हवे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत असंतुष्ट नेत्यांच्या जी-२३ गटावरही टीका केली जात आहे, जे सतत पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वावर दबाव आणत आहेत.

तसेच भविष्यात तरुणांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे. पक्ष बळकट करण्यासाठी त्यात अधिकाधिक तरुणांची भर पडणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, या बैठकीत पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाभोवतीच चर्चा फिरत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जयराम रमेश यांच्या म्हणण्यावर राहुल यांनी सहमती दर्शवली. पक्षाने चांगल्या पद्धतीने रणनीती आखून पुढे वाटचाल केल्यास येणाऱ्या गुजरात निवडणुकीत भाजपचा पराभव केला जाऊ शकतो, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, या बैठकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही या बैठकीत तरुणांच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

‘उत्तर प्रदेश निवडणुकीत ४५ वर्षांखालील ६० टक्के स्त्री-पुरुषांना आम्ही तिकीट दिले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पक्षाच्या भवितव्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचं कळतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
नरेंद्र मोदी किती वर्षे पंतप्रधानपदी राहणार? स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केली भविष्यवाणी, म्हणाले…
‘या’ कंपनीच्या शेअरने दिला ४,५४,९०० टक्क्याहून अधिक परतावा, गुंतवणूकदार झाले करोडपती
‘पतीच्या रक्ताने माखलेला भात जबरदस्तीने पत्नीला खाऊ घातला’, काश्मिरी पंडितांचा किस्सा वाचून काळीज फाटेल
अपहरण करून गँगरेप केला, नंतर करवतीने केले दोन भाग; गिरीजा टिक्कूच्या भाचीने सांगितला भयानक किस्सा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now