Share

“भारतात परिस्थिती ठीक नाही, भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न,” राहुल गांधींची घणाघाती टिका

rahul gandhi narendra modi

“भाजपने देशभर रॉकेल ओतलं आहे, तुम्हाला एक ठिणगी हवी आहे आणि आपण मोठ्या संकटात पडू” अशी जळजळीत टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केली आहे. राहुल गांधी सातत्याने केंद्रातील भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. अशाच प्रकारे पुन्हा एक राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष केलं आहे.

शुक्रवारी राहुल गांधी लंडनच्या केम्ब्रिज विद्यापीठात आयडियाज फॉर इंडिया या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राहुल गांधींनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यावेळी ‘भारताची स्थिती चांगली नाही, भाजपने देशभर रॉकेल ओतले असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘भाजप सध्या देशात रॉकेल शिंपडण्याचे काम करत आहे. त्याची एक ठिणगी मोठी आग लावू शकते. ही आग विझविण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. ‘भाजपने वाढवलेले हे तापमान आपल्याला कमी करणे आवश्यक आहे. कारण हे तापमान कमी झाले नाही तर सर्व काही चुकीचे होऊ शकते,’ असं राहुल गांधी म्हणाले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘काँग्रेसला पूर्वीचा भारत परत मिळवायचा आहे. त्यासाठी आम्ही लढतो आहोत. भाजप आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे. याशिवाय, चीन प्रश्नावरूनही राहुल यांनी केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे.

दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत सीताराम येचुरी, सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोइत्रा आणि मनोज झा यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ‘भाजप सरकारच्या काळात रोजगार कमी झाले आहेत. असं असूनही ध्रुवीकरणामुळे ते सत्तेत टिकून राहिले आहेत, असं यावेळी राहुल म्हणाले.

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी सध्या पक्षात सुरू असलेल्या परिस्थितीवर भाष्य केले. “काँग्रेसला अंतर्गत कलह, पक्ष बदल आणि निवडणूकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागत आहे,” असे त्यांनी म्हंटलं आहे. दरम्यान, काँग्रेसची ही लढाई आता वैचारिक लढाई आहे. ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई असल्याच त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘रानबाजार’मधील बोल्ड सीन्सवर ट्रोल करणाऱ्यांना तेजस्विनीनं स्पष्टच सांगितलं; “कपडेच काढायचे असते तर….”
लाल महालातील लावणीचा वाद! अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक; गौमूत्राने केले शुद्धीकरण
…म्हणून आम्ही शरद पवारांची भेट नाकारली; ब्राम्हण महासंघाने स्पष्टच सांगितले
‘तुझं नेमकं चाललय तरी काय?’; ‘रानबाजार’च्या बोल्ड भूमिकेनंतर ‘त्या’ फोटोवरून प्राजक्ता पुन्हा निशाण्यावर

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now