Share

बुलडोजर चालवण्यापेक्षा भाजपने नागरिकांसाठी ‘ही’ सोय करावी, राहुल गांधींची मागणी

दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीच्या महानगरपालिकेने  बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ते बुलडोझरच्या मदतीने बेकायदेशीर बांधकाम तोडत आहे. पण ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाने थांबवण्याचा आदेश दिला आहे. (rahul gandhi criticize modi government)

भाजपच्या या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावरुन विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधत आहे. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. जहांगीरपुरी हिंसाचारानंतर भाजपशासित एमसीडीने बुलडोझर चालवण्यावर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतरही कारवाई सुरू ठेवण्यावर राहुल यांनी आक्षेप घेतला आहे.

हे भारताच्या संवैधानिक मूल्यांचे उल्लंघन आहे. भाजपने अल्पसंख्यांक गरीब लोकांविरोधात असणारा मनातील राग काढून टाकायला हवा. बुलडोझर चालवण्यापेक्षा भाजपने नागरिकांसाठ विजेची सोय करावी, असे राहूल गांधी यांनी म्हटले आहे.

आज राहुल गांधी यांनी या मुद्यावर ट्विट केले होते. त्यांनी लिहिले होते, मोदीजी, महागाईचे युग सुरू आहे. या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने छोटे उद्योग कोलमडतील. त्यामुळे भविष्यात नोकऱ्यांचे आणखी नुकसान होणार आहे. त्यामुळे द्वेषाचे बुलडोझर थांबवा आणि वीज प्रकल्प सुरू करा.

तसेच या प्रकरणावर आक्षेप घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर म्हणाले की, राजकारणाचा खेळ आता खूप घाणेरडा झाला आहे. जहांगीरपुरीमध्ये बुलडोझरच्या कारवाईचा फोटो पोस्ट करत शशी थरूर यांनी ट्विट केले की, प्रत्येकजण लाचार आणि लाचार होत चालला आहे. आता राजकीय खेळ खूप घाणेरडा झाला आहे.

याप्रकरणी समाजवादी पक्षानेही भाजपवर निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाने ट्विट केले की, संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जहांगीरपुरी, दिल्ली येथे बुलडोझर चालवून गरीबांची भाकरी, शांतता हिसकावून घेण्याचा भाजपचा आणखी एक प्रयत्न आहे. भाजपची ही कारवाई भारताच्या मानवी हक्कांना चिरडत आहे.

महत्वाच्या बातम्या-
मशिदीजवळ तोडफोड करणारा बुलडोजर मंदिराजवळ येताच का थांबला? लोकांनी कारवाईवर उपस्थित केले प्रश्न
…त्यामुळे चड्डीत राहायचं काय समजलं? मनसेची थेट अमोल मिटकरींना धमकी
संतापजनक! 13 वर्षीय चिमुकलीवर तब्बल आठ महिने 80 नराधमांकडून बलात्कार, पोलिसांची मोठी कारवाई

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now