World Cup: भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 विश्वचषक 2022 सामना उद्यापासून अॅडलेड ओव्हलवर दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल. भारत सध्या गट 2 च्या गुणतालिकेत 3 सामन्यांत 2 विजय आणि 1 पराभवामुळे 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशविरुद्धच्या विजयामुळे भारताचे 6 गुण होतील आणि उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. India, Bangladesh, World Cup, Rahul Dravid
T20 विश्वचषक 2022 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आज म्हणजेच मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत प्रशिक्षक राहुल द्रविडला उद्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिक यष्टिरक्षक म्हणून खेळणार की ऋषभ पंत, असा प्रश्न विचारला असता, त्याने आपल्या उत्तराने सर्वांनाच चकित केले.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने म्हटले आहे की, अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची फिटनेस पाहून त्याला बांगलादेशविरुद्ध टी-20 विश्वचषक 2022 मधील सामना खेळवायचा आहे की नाही याचा अंतिम निर्णय उद्या घेतला जाईल. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा पाच विकेट्सनी पराभव झाला तेव्हा दिनेश कार्तिकला पाठीच्या खालच्या भागाला दुखापत झाली, त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले.
दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित डावात ऋषभ पंतने यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कार्तिकच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाली. द्रविड म्हणाला, ‘दुर्दैवाने, कार्तिकने बाउन्सर पकडण्यासाठी हवेत उडी मारली, पण नंतर तो चुकीच्या पद्धतीने जमिनीवर पडला आणि त्याला पाठीची समस्या निर्माण झाली.’
द्रविड म्हणाला, काही उपचारांनंतर कार्तिक आज बरा होताना दिसत आहे. तो ट्रेनिंगसाठी आला आहे आणि आम्ही त्याचे मूल्यांकन करत आहोत. द्रविड म्हणाला, आजच्या चांगल्या सरावानंतर त्याचा फिटनेस कसा आहे ते उद्या पाहायला मिळेल. उद्या त्याचा फिटनेस पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाईल.
महत्वाच्या बातम्या-
Accused of rape on player: संघाला विश्वचषक जिंकवून दिलेल्या खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा दाखल; १० हजार महीलांवर बलात्कार केल्याचा आरोप
Sachin Tendulkar : माझं मन ‘या’ टिमसोबत अन् त्याच टिमने विश्वचषक जिंकावा अशी माझी इच्छा, सचिन तेंडुलकरने स्पष्टच सांगितलं
ह्रदयाची धडधड वाढवणाऱ्या सामन्यात भारत अखेरच्या षटकात पराभूत, पाकीस्तान विश्वचषकाच्या बाहेर






