रविवारी झालेल्या जातीय हिंसाचारानंतर दिल्लीत महापालिकेला अचानक जाग आली आणि त्यांनी आपल्या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहे. (raghav chaddha on buldozers actions)
आदेश दिल्यानंतरही हे काम सुरु होते, मात्र सीपीआय नेत्या वृंदा करात न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन जहांगीरपुरीला पोहोचल्यावर ही कारवाई थांबली. न्यायालयाच्या आदेशाची माहिती मिळताच बुलडोझरची कारवाई थांबवण्यात आल्याचे विशेष सीपी दीपेंद्र पाठक सांगतात.
अशात एक हैराण करणारी माहिती समोर आली आहे. फक्त एक दिवस आधीच या भागात बुलडोझर चालवण्याचा इशारा तिथल्या नागरिकांना देण्यात आला होता. तसेच कारवाईपूर्वी त्यांना त्यांचे सामान काढण्यासाठी वेळ देण्यात आला नसल्याचा आरोप लोक करत आहे. भाजप याला दिल्लीची ‘स्वच्छता’ म्हणत आहे, तर विरोधक याला अन्यायकारक कृती म्हणत आहेत.
गेल्या १५ वर्षांपासून दिल्ली महानगरपालिकेवर भाजपचे नियंत्रण आहे. आज ज्या बेकायदेशीर वस्त्या उद्ध्वस्त झाल्या त्यापैकी बहुतांश भाजपच्या राजवटीत उभ्या राहिल्या आहेत. या बेकायदा वस्त्या पाडण्याचे आजपर्यंत महापालिकेच्या लक्षात का आले नाही, हा मोठा प्रश्न आहे, असे विरोधक म्हणताना दिसून येत आहे. आता आप नेते राघव चड्ढा यांनी यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजपच्या नेत्यांनी आधी लाच घेऊन या वस्त्या उभ्या केल्या आहे. तसेच आज ते पाडण्याची कारवाई करून ती चूक लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी केला आहे.
ज्या भाजप नेत्यांनी या भागात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या मुस्लिमांना स्थायिक होऊ दिले त्यांच्या घरांवरही बुलडोझर चालवावा, असे ते म्हणाले. चड्ढा यांनी भाजपवर जातीय हिंसाचार भडकावल्याचा आरोपही केला आहे. भारतात होणारे दंगे जर थांबवायचे असेल तर भाजपच्या मुख्यालयावरही बुलडोझर चालवायला हवे, असे राघव चड्ढा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले की, ही संपूर्ण कारवाई संविधान आणि कायद्यानुसार केली जात आहे, त्यामुळे दिल्लीला अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले पाहिजे. या बेकायदेशीर वस्त्यांमधून गुन्हेगारी कारवाया केल्या जात असल्याचे संपूर्ण देश आणि दिल्लीला समजते, त्यामुळे आज झालेल्या या कारवाईचे स्वागतच केले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या-
‘होय मी कामगारांकडून कोट्यावधी रूपये घेतले’; सदावर्तेंनी दिली कबुली; वाचा पैशांचा हिशोब..
आता रोजगार गेलेल्या मुलांनी काय करायचे? बुलडोझर कारवाईनंतर लोकांचा आक्रोश
ग्लॅमरस भूमिका साकारणाऱ्या ललिता पवार कशा झाल्या चित्रपटातील क्रुुर सासू? वाचा त्यांचा जीवनप्रवास