Share

राधे माँचा मुलगा आहे हँडसम हंक, दिसण्यात देतो मोठमोठ्या अभिनेत्यांना टक्कर; पहा फोटो

आज राधे माँला कोणत्याही नवीन ओळखीची गरज नाही. जगभरातील लाखो लोक त्यांना फॉलो करतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, त्यांना एक मुलगाही आहे. जो की बॉलिवूडच्या हिट चित्रपटांमध्येही दिसून आला आहे. तो ड्रीम गर्ल आणि आय ऍम बनी सारख्या काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. (radhe maa son photo)

राधे माँच्या मुलाचे नाव हरजिंदर सिंग आहे. तो ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या रणदीप हुड्डाच्या वेब सीरिज दिसून येणार आहे. या सिरीजमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जेव्हापासून लोकांना याची माहिती मिळाली तेव्हापासून ते हरजिंदरला वेब सीरिजमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

हरजिंदर सिंगने नुकतीच एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्याने लहानपणापासूनच क्रिकेटर किंवा अभिनेता व्हायचे असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने हेही सांगितले आहे की त्याने क्रिकेटर बनण्याचा विचार का सोडून दिला आणि त्याने अभिनयाला का सुरुवात केली?

तो म्हणाला की, क्रिकेटर किंवा अभिनेता बनणे हे माझे दोनच छंद आहेत. माझ्या माहितीप्रमाणे क्रिकेट खेळण्याचे एक ठरावीक वय असते. एक काळ असा होता की अभिनेत्यांचेही वय होते पण आता तसे राहिले नाही. आता तुम्ही कधीही कॅमेरासमोर येऊ शकता. कारण आपण नेहमीच तरुण पात्रात दिसत नसतो आपण वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो.

पुढे तो म्हणाला की, मी पुण्यातील एमआयटीमधून शिक्षण घेतले आहे. तिथे जे काही कार्यक्रम व्हायचे, त्यात माझा सहभाग असायचा. त्यानंतर मी स्टेजवर सादरीकरण करायला लागलो मग मलाही कळलं की मला स्टेज खुप आवडतो. यासोबतच रणदीप हुड्डासोबत काम करण्याबाबत तो म्हणाला की, त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.

एक अभिनेता म्हणून मला रणदीप खूप आवडतो. लखनऊमध्ये मी त्याला हेही सांगितले होते की, अनेकवेळा मी चित्रपट पाहायला जात नाही, तर त्याला पाहायला जातो, नाहीतर मी चित्रपट पाहायलाच जात नाही. माझ्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत, पण त्यावर सध्या मी बोलू शकत नाही, असेही हरजिंदर सिंगने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
फेसबुकची मैत्री भोवली; गायछापचा वारसदार भासवून लावला चुना, वाचा नेमकं प्रकरण काय?
‘शालेय अभ्यासक्रमात बदल करून भाजप मुलांच्या मनात विष पेरत आहे’ – शरद पवार
भर सभेत शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल चोरणारा ‘चोरटा’ सापडला; कोण आहे चोरटा?

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now