Share

ऑडिशन घेत असल्याचे सांगत पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार

गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अनेक धक्कादायक घटनाही समोरं येत आहे. अशात आता पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण खळबळ उडाली आहे.

चाकण परिसरातील एका प्रसिद्ध उद्योजकाने ऑडिशन घेत असल्याचे सांगत १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. त्यानंतर त्या मुलीने याबाबत आईला सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. आता याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी उद्योजक आता फरार झाला आहे. राजेंद्र गायकवाड असे त्या उद्योजकाचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा मुलीच्या घरी आला होता. यावेळी त्याने मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देतो असे सांगितले. त्याने आई ऑडिशन घेतो म्हणत आई वडिलांना घराच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने मुलीला कपडे उतरवायला लावले.

मुलीने कपडे काढल्यानंतर त्याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबद्दल कोणालाही सांगितले तर जीव घेईल अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. या सर्व प्रकारामुळे पीडिता खूप घाबरली होती. घडलेला हा सर्व प्रकार तिने तिच्या आईला सांगितला.

त्यानंतर आईवडिलांनी लगेच पोलीस स्टेशनमध्ये जात राजेंद्र गायकवाड या उद्योजकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्या उद्योजकाविरोधात गुन्हा केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

महत्वाच्या बातम्या-
ऑडिशन घेत असल्याचे सांगत पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार
माझे स्तन दाबले, पँटमध्ये हात घातला अन्…; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला बॉलीवू़ड डायरेक्टरचा भांडाफोड
४० कढया आमटी, १ लाख बाजरीच्या भाकऱ्या, देवाच्या प्रसादासाठी पुण्याजवळील ‘या’ गावात उसळली गर्दी

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now