Share

पुणेरी बायकोची डोकॅलिटी; आंबट शौकीन असणाऱ्या पतीला ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरुन रंगेहाथ पकडलं

लग्नानंतर अनेक लोकांचे हे विवाहबाह्य संबंध असतात. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींमुळे पती-पत्नीला एकमेकांवर संशय येतो. काही वेळा तर आपला साथीदार दिवसभर आपल्या पाठीमागे काय करतो हे जाणून घेण्यासाठी ते एजंटही लावतात. पण आता पुण्यातून एक विचित्रच प्रकार समोर आला आहे. (punekar wife caught husband with girlfriend )

पुण्यातील एका महिलेने आपल्या नवऱ्याचं बाहेरचं बिंग फोडलं आहे. त्यानंतर पत्नीने स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. या पती-पत्नीचा १७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००५ मध्ये सुरतमध्ये विवाह झाला होता.

पत्नीला आपला पती आंबट शौकीन असल्याचा संशय आधीपासूनच होता. लग्नानंतर तिचा पती बंगळुरुला जायचा. नवरा सततच बंगळुरुला जायचा हे पाहून पत्नीच्या मनात शंका आली. तसेच नवऱ्याची वागणूकही पत्नीला खटकत होती. त्यामुळे तिचा संशय वाढतच चालला होता.

आपला नवरा नक्की काम करतोय की आणखी काही करतोय याबद्दल पत्नीला जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यामुळे संशय असलेल्या पत्नीना आपल्या पतीच्या गाडीत जीपीएस डिव्हाईस लावला. या जीपीएसमुळे बाहेर अफेअर असलेल्या पतीचे बिंग फुटले आहे.

उद्योजक हा गुजरातला जाऊन आपल्या चंदीगडच्या गर्लफ्रेंडला घेऊन आला. त्याने आपल्या गर्लफ्रेंडला थेट पिंपरी चिंचवडच्या एका हॉटेलमध्ये नेले. पण जीपीएसमुळे तो कुठे आहे हे पत्नीला लगेच कळले. त्यामुळे तिने थेट हॉटेलशी संपर्क साधला. तेव्हा पती आणि त्याची गर्लफ्रेंड त्या हॉटेलात असल्याचे तिला समजले.

संबंधित महिला जेव्हा हॉटेलमध्ये पोहचली तेव्हा तर तिला धक्काच बसला. कारण पतीची गर्लफ्रेंड त्या महिलेचं आधारकार्ड वापरुन त्या हॉटेलमध्ये थांबली होती. या सर्व गोष्टी हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्या होत्या. हे सर्व फुटेज पोलिसांना देत महिलेनं पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
मधूबालाच्या ९६ वर्षाच्या बहिणीला सुनेने काढले घराबाहेर; जेवणही दिले नाही, टॉर्चर केल्यामुळे झाली भयानक अवस्था
चार मुलांची आई गेली जुन्या प्रियकराला भेटायला; सकाळी नग्न अवस्थेत सापडला मृतदेह
शुटींगच्या पहिल्याच दिवशी घ्यावी लागली गर्भनिरोधक गोळी, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now