Share

नशीब पुण्यात नाही, नाहीतर सोलून काढला असता; धमकी देणाऱ्या सावंतांवर पुण्यातील शिवसैनिक भडकले

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार असून ते अजूनही गुवाहटीमध्ये आहे. (pune shivsainik angry on mla)

आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक चांगलेच तापले आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन करत आहे. अशात काही शिवसैनिक हे बंडखोर आमदारांवर खुपच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही आमदारांचे तर ऑफिसही फोडण्यात आले आहे.

शिवसेनेचे भूमपरांडा तालुक्याचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. तानाजी यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आलेली आहे.

पुण्यातील शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नशीब पुण्यात आमदार नाही, नाहीतर सोलून काढला असता, असे विधान पुण्याचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केले आहे. या फोडाफोडाची सुरुवात आम्ही तानाजी सावंतांपासून केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच जे जे आमदार फुटले त्यांना चोख उत्तर दिले जाईल. प्रत्येक शिवसैनिक त्यांना उत्तर देणार, असेही विशाल धनवडे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यातील अश्रू सगळ्या जनतेच्या डोळ्यातील अश्रू आहे. त्यांचे अश्रू कोणताच शिवसैनिक बघू शकत नाही, असेही विशाल धनवडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आमचे गटनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहे. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी दिला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात कडवट! शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना रक्ताने लिहीलं पत्र; केलं ‘हे’ आवाहन
काँग्रेसने शेअर केला एकनाथ शिंदेंचा हलताडुलता व्हिडीओ, प्रतिक्रियांचा पाऊस; पहा व्हिडीओ
बंडखोर आमदारांचे शिवसेनेलाच आव्हान; म्हणाले, ‘मते केवळ शिवसेनेच्या नावावर मिळत नाहीत’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now