काही दिवसांपूर्वीच पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉस्पिटलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, ज्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. या रुबी हॉस्पिटलमध्ये किडनी तस्करीचा प्रकार समोर आला होता. आता याप्रकरणी चौकशी सुरु असताना मोठी माहिती समोर आली आहे. (pune rubi hospital kidney racket)
किडनी तस्करी करणाऱ्या आणखी तीन हॉस्पिटलची नावे समोर आली आहे. संबंधित रुग्णालयांमध्ये पुणे, ठाणे आणि कोईम्बंतूरमधल्या रुग्णालयांचा समावेश आहे. या तिन्ही रुग्णालयांची नावे समोर आल्याने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील वानवडी येथील इमानदार हॉस्पिटल, ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल आणि कोईम्बंतूरमधील के एम सी एच या तीन रुग्णालयांचा या किडनी रॅकेटमध्ये समावेश आहे. रुबी हॉस्पिटलमध्ये ज्याप्रकारे बनावट कागदपत्रांद्वारे एजंटच्या मार्फत किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे, तसेच या तिन्ही हॉस्पिटमध्येही करण्यात आले होते.
रुबी हॉस्पिटल प्रकरणी पोलिस जेव्हा तपास करत होती, तेव्हा त्यांना ही धक्कादायक माहिती मिळाली आहे. किडनी तस्करीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर आता हा तपास कोरेगांव पोलिसांकडून काढून घेण्यात आला आहे. तसेच आता हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी प्रत्यारोपण प्रकरणी पोलिसांनी दोन एजंटांना अटक केली आहे. अभिजित शशिकांत गटणे (वय ४०) आणि रविंद्र महादेव रोडगे (वय ४३) असे अटक करण्यात आलेल्या दोन एजंटांची नावे आहे. अभिजीत हा गावठानचा रहिवासी आहे, तर रविंद्र हा पिंपरी-चिंडवडचा रहिवासी आहे.
दरम्यान, रूबी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एजंटांच्या किडन्या दिलेल्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच आणखी दोन खोटे नातेवाईक दाखवून किडनी मिळवून दिल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
गुजरात फायनलमध्ये पोहोचताच हार्दिक पांड्याच्या डोक्यात गेली हवा, म्हणाला, माझं नाव विकलं जातं त्यामुळं..
एका पायावर लंगडत शाळेत जाणाऱ्या अपंग मुलीच्या मदतीला धावून आला सोनू सूद; म्हणाला…
“सगळी प्रॉपर्टी विकली तरी या सायकलची सर येणार नाही”, वडिलांच्या आठवणीत वसंत मोरे भावुक