राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमध्ये हाणामारी झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाब्दिक वादातून काही माजी स्वयंसेवकांनी शाखा प्रशिक्षकाला दंड आणि चामडी पट्ट्याने मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडली आहे. (pune rss students beat teacher)
याप्रकरणी आता हर्षवर्धन सुनिल हरपुडे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. कुंदन सोनावणे, रुपेश खाडे, अमन शेख, हेमंत जाधव यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सहकारनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परीसरात एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी हर्षवर्धन हा २१ वर्षांचा असून तो लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे. तो अनेक वर्षांपासून अध्यापक कॉलिनीतील मैदानावर संघातील मुलांना प्रशिक्षण देण्याकरीता जातो.
टांगेवाला कॉलनी येथे राहणारे हेमंत जाधव, कुंदन सोनावणे, अमन शेख, आणि काही विद्यार्थीही शाखेत येत होते. पण चार-पाच वर्षांपूर्वी शाब्दिक वाद झाल्यामुळे त्यांनी शाखेत येणे बंद केले होते. मंगळवारी शाखेतील प्रशिक्षण संपल्यावर ते बाहेरच्या कट्ट्यावर बसले होते.
त्यावेळी तिथे काही लहान मुलांमध्ये वाद सुरु होता. त्यावेळी हर्षवर्धनने त्यांच्यात मध्यस्थी केली. हे पाहून हेमंत आणि त्याचे मित्र तिथे आले आणि ते हर्षवर्धनशी वाद घालू लागले. त्यानंतर हा वाद वाढत गेला आणि त्यांच्यात थेट हाणामारी सुरु झाली. हर्षवर्धन एकटा असल्याने त्याला हेमंत, कुंदन हे मारु लागले.
हर्षवर्धनला हेमंतने शेजारी असणाऱ्या झाडाच्या फांदीने तर कुंदनने त्याच्याकडे असलेल्या चामड्याच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एकाने कट्ट्यावर ठेवलेला लाकडी दंड कुंदनच्या पाठीत मारला आणि ते सर्व तिथून पळून गेले. त्यानंतर आता हर्षवर्धनने त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली असून पोलिस याचा तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
..तेव्हा अमिषा पटेलला आईने कानाखाली लावून घरातून दिले होते हाकलून, ‘हे’ होते कारण
पंकजांना डावलल्यामुळे मुंडे समर्थकांचे बंड; म्हणाले, चंद्रकांत पाटलांच्या तोंडाला काळं फासणार
मैने प्यार कियाच्या सेटवर घमंडी सलमान लक्ष्याशी फटकून रहायचा; मग लक्ष्याने त्याची अशी जिरवली की..