पुणे: गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेला स्वर्णव चव्हाण उर्फ डुग्गु अखेर काल पुणे पोलिसांना सापडला. पुणे पोलिसांना वाकड जवळ असलेल्या एका इमारतीत डुग्गु सापडला. आरोपीने त्या इमारतीजवळ डुग्गुला सोडलं होत. डुग्गुला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी खूप मेहनत घेतली होती. डुग्गु सापडल्यामुळे सर्व स्तरांतून पुणे पोलिसांचे कौतुक होत आहे.
डुग्गु बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. डुग्गुला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची एक मोठी फौज तैनात करण्यात आली होती. त्याच्या शोधावेळी अत्यंत गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास ३०० ते साडेतीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते.
पुनवळ्यातील लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला आरोपीने सोडले आणि त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्या चिठीवर त्याच्या वडिलांचा नंबर होता. त्या इमारतीचा सुरक्षा रक्षक दादाराव जाधव याने पुणे पोलिसांना डुग्गु सापडल्याची माहिती दिली. त्यानंतर डुग्गु संदर्भातील माहिती पुणे पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना दिली.
डुग्गु सुखरूप सापडल्यानंतर तो इतके दिवस कुठे होता? आणि त्याचे कोणी अपहरण केले, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. याबाबत पुणे पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. “या सर्व प्रकरणी आम्ही सखोल तपास करत आहोत. या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरु होता आणि तो राहिल. या प्रकरणाच्या मुळाशी पुणे पोलीस १०० टक्के जातील”, अशी महत्वपुर्ण माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
“आम्ही तपासाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आमच्याकडे योग्य धागेदोरे आहेत. आता आम्ही तपास आणखी वेगाने करुन सर्व सत्य समोर आणू, अशी महत्वाची माहिती पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केला आहे. या क्षणाला अधिक माहिती देणं उचित राहणार नाही. या प्रकरणात कोणतीही बाधा येईल, असं कोणतही वृत्त माध्यमांनी देऊ नये”, असे आवाहनही पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केले आहे.
डुग्गु सापडल्यानंतर त्याच्या आई वडिलांना खूप आनंद झाला आहे. डुग्गूच्या आई वडिलांनी पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच पुणे पोलिसांना माहिती देणाऱ्या सुरक्षारक्षक दादाराव जाधव यांचे देखील आभार मानले आहेत. डुग्गू सापडल्याच्या आनंदात लोकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
महत्वाच्या बातम्या
पोरींचा नाद करायचा नाय! दोन तरुणींनी एका तरुणाला भरचौकात धू धू धूतलं; पहा व्हिडीओ
अमोल कोल्हेंनी नथुरामची भूमिका केल्याने आव्हाड संतापले; म्हणाले, कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही…
बॉलिवूडने नाकारले पण साऊथमध्ये केला धमाका; आता आहेत सुपरस्टार, वाचा या अभिनेत्यांबद्दल..
प्रसिद्ध अभिनेत्रीचा खून करून मृतदेह भरला होता पोत्यात, पतीनेच दिली गुन्ह्याची कबूली