Share

पुणे हादरलं! उच्चशिक्षीत तरूणाने मुलीसमोरच केली बायकोची हत्या, आधी डोकं भिंतीला आपटलं मग..

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. असे असतानाच आता पिंपरीतून एक भयानक घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित तरुणाने आपल्याच पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. शिवम पचौरी असे तरुणाचे नाव आहे. (pune man kill wife)

शिवमला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवम हा व्यसनी होता. त्यामुळे तो रोज दारु पिऊन घरी यायचा. यातून तो अनेकदा त्याच्या पत्नीला मारहाणही करायचा. अशातच त्याने त्याच्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. अवंतिका शर्मा असे त्याच्या पत्नीचे नाव होते.

शिवम हा उच्चशिक्षित असून नुकतीच त्याने आयटी कंपनीतील नोकरी सोडली. त्यामुळे तो बेरोजगार झालेला होता. तो रोज दारु पिऊन घरी यायचा, त्यामुळे अनेकदा त्याचे पत्नीसोबत वाद व्हायचे. त्यामुळे तो पत्नीला खुप मारहाण करायचा, या दोघांना तीन वर्षांची एक मुलगी सुद्धा आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दोन दिवसांपूर्वी तो दारु पिऊन आपल्या घरी आला होता. त्यावेळी नेहमीप्रमाणे त्याचा पत्नीसोबत वाद झाला. त्यातूनच त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आधी त्याने तिचे डोके भिंतीला आपटले आणि त्यानंतर तिला खाली पाडून तिचा गळा दाबला आणि तिची हत्या केली.

शिवमने जेव्हा तिची हत्या केली तेव्हा त्यांची तीन वर्षांची मुलगी तिथेच होती. तिच्यासमोरच त्याने अवंतिकाची हत्या केली आहे. या घटनेनंतर त्याने स्वत: पोलिसांना फोन लावला होता. त्यानंतर पोलिस तिथे पोहोचले आणि त्यांनी त्याला अटक करत पोलिस ठाण्यात नेले.

दरम्यान, मार्च महिन्यातही अशीच एक घटना घडली होती. मार्च महिन्यात पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यक्तीने पत्नीला मारहाण करुन तिची हत्या केली होती. घरातील शुल्लक वादातून ही हत्या करण्यात आली होती. पत्नीची हत्या केल्यानंतर तो पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला होता.

महत्वाच्या बातम्या-
संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर संजय पवार निवडून आले असते’, छगन भुजबळ स्पष्टच बोलले
भाजपचा फार मोठा विजय नाही, ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या.., अमोल मिटकरींचा भाजपवर हल्लाबोल
महाडिकांच्या विजयाचे श्रेय फडणवीसांना देताना चंद्रकांत पाटलांना भावना अनावर, म्हणाले, मुंगी होऊन..

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now