उत्तर प्रदेशातील कानपूर या शहरामध्ये एक धक्कादायक प्रेमकहाणी समोर आली आहे. येथील एक तरुण इन्स्टाग्रामवरुन पुण्यातील एका महिलेच्या प्रेमात पडला. या दोघांमधलं प्रेम इतकं वाढलं की पुण्यातील महिलेनं सगळं सोडून कानपूर गाठलं. कानपूरच्या प्रियकर तरुणानेही प्रेयसीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तरुणाच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. (pune girl instagram love story)
तसेच तरुणाची प्रेयसी आधीच विवाहित असल्याचे निष्पन्न झाले. महिलेला १ मूलही आहे. हे ऐकून कानपूरच्या तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. आता या प्रेम प्रकरणाची सगळीकडे चर्चा होत आहे. संबंधित महिला ही पुण्याची राहणारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर येथील एका तरुणाची ४ महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर एका २४ वर्षीय तरुणीशी मैत्री झाली होती. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेयसीने तरुणाला पुण्याहून त्याच्या घरी येतेय असे सांगितल्यावर तरुणाने तिला हसून टाळले.
त्यानंतर एके दिवशी अचानक प्रेयसी पुण्याहून प्रियकराचे शहर कानपूर येथे पोहोचली. अचानक ती आल्याचे समजताच तरुण घाबरला. त्याने प्रेयसीला घराबाहेर भेटून आपल्या ओळखीच्या घरी राहायला लावले. त्यानंतर हा तरुण आपल्या प्रेयसीला घरच्यांसमोर आणण्याच्या बेतात होता.
तरुणाच्या विचित्र वागण्यामुळे कुटुंबीयांना संशय आला आणि नंतर त्यांना त्याच्या प्रेयसीची माहिती मिळाली. आठवडाभरानंतर तो प्रेयसीला घरी घेऊन आला तेव्हा घरच्यांनी चांगलाच गोंधळ घातला. कुटुंबीयांनी प्रेयसीला परत पाठवण्याचा आग्रह धरला, मात्र तरुण तयारच होत नव्हता.
त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर मुलीने तिला घरच्यांशी बोलायला लावले. यानंतर ही मुलगी पती आणि अडीच वर्षाच्या मुलाला सोडून प्रियकराला भेटण्यासाठी कानपूरला आल्याचे समजले. हे कळताच त्याच्या कुटूंबियांना धक्काच बसला.
चकेरी पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पुण्यातील एका २४ वर्षीय महिलेची ४ महिन्यांपूर्वी कानपूरमधील २० वर्षीय तरुणाशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. १३ फेब्रुवारी रोजी महिला पती आणि अडीच वर्षाच्या मुलाला सोडून तरुणासाठी कानपूरला आली होती.
महत्वाच्या बातम्या-
Russia Ukraine War: आतापर्यंत रशियाच्या किती सैनिकांचा मृत्यु झाला? पहिल्यांदाच समोर आली आकडेवारी
…तर तुमची गाडी लगेच भंगारात टाकली जाणार; मोदी सरकार नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत
भाजपला मोठा झटका, माजी राज्यमंत्री हाती बांधणार घड्याळ, २ एप्रिलला करणार पक्षप्रवेश