Share

शाळेच्या घंटा पुन्हा वाजणार! अजित पवारांची मोठी घोषणा; शाळेबाबतच नवे नियम काय? वाचा सविस्तर

ajit pawar

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यापूर्वी राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. नंतर २३ जानेवारीला राज्यातील काही भागातील शाला सुरू झाल्या होत्या. मात्र कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता पुणे जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचाच निर्णय घेतला होता. परंतु आता पुन्हा शाळेच्या घंटा वाजणार आहे. (pune district schools reopen from 1 february)

पुण्यात माध्यमांशी बोलताना याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. आता येत्या १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील शाळा सुरू होतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली. पहिली ते आठवीपर्यंतची शाळा 4 तास सुरू ठेवली जाणार आहे.

आपल्या पाल्ल्यांना शाळेत पाठवायचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी पालकांनी घ्यायचा आहे. शाळेत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल, असेही अजित पवार म्हणाले. इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले. तसेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे.

या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. शिक्षणसंस्थेत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांना मास्क घालणे बंधनकारक असेल, असे पवार यांनी सांगितले. अठरा वर्षांखालील मुलांना शिक्षणसंस्थेत ऑफलाइन शिक्षणासाठी येण्याकरिता पालकांकडून लेखी संमतीपत्र सोबत आणावे लागेल, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांकडून याबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. शाळेत जाताना पालकांनी विद्यार्थ्यांना मास्कचं बंधन करावं, याचबरोबर शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा असणार असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. तसेच शाळेची वेळ फक्त चार तास – विद्यार्थ्यांनी नाश्ता करून यायचं, आणि त्यानंतर जेवण घरी जाऊन करायचं, असेही सांगण्यात आले आहे.

मास्क काढायला लागेल अशा अॅक्टिव्हिटी टाळणार असल्याचेही नियमावलीत सांगण्यात आले आहे. तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रविवारी आणि सोमवारी शाळा सॅनिटाइज करण्यात यावव्या, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. शाळा सुरू होत असल्यातरी ८वी पर्यंतच्या शाळा चार तास भरवल्या जाणार, तर ९वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या
प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पोटच्याच मुलीला जंगलात सोडले; आईच्या नावाला काळीमा फासणारी घटना
“शरद पवारांनी खूप सोसलं आहे त्यामुळे तरुण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका ते कधीही घेणार नाहीत”
Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनच्या भांडणात चीनने खेळली मोठी खेळी, भारताची वाढली चिंता
”मोदींच्या ५६ इंच रुंद छातीवर चिनी चढून बसले आहेत तरीपण ते गप्प आहेत”

इतर राजकारण राज्य शिक्षण

Join WhatsApp

Join Now