Share

पुण्यातील दाम्पत्याचे दहशतवाद्यांशी संबंध, NIA च्या ऑपरेशनमधून समोर आला ‘हा’ भयानक प्रकार

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित असल्याच्या संशयावरून पुण्यातील कोंढवा येथून एका दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) संबंधित व्यक्तींच्या घरावर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. (pune couple arrested who raleated with isis)

इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातून अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव तलहा खान असे आहे. तो जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षी अटक करण्यात आलेल्या इसिसच्या दहशतवाद्याच्या संपर्कात होता. एनआयएने सोमवारी संध्याकाळी पुण्यातील कोंढवा येथील इमारतीत राहणाऱ्या तलहा खानच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान एनआयएने काही महत्त्वाचे कागदपत्रे आणि डिव्हाईस जप्त केले आहे.

एनआयएने तलहा खानच्या घरातून सापडलेली कागदपत्रे आणि डिव्हाईसेस आपल्या ताब्यात घेतली आहे. तलहा खान इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या खोरासान गटासाठी काम करत असल्याचा संशय आहे. या अटकेची बातमी समजताच आजूबाजूचे लोक घाबरले आहेत.

याप्रकरणी चार जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी तलहा खान नवीनल सिद्दिकीच्या संपर्कात होता. मार्च २०२० मध्ये या प्रकरणी दिल्लीच्या लोधी कॉलनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षीच काश्मीरमध्ये राहणारे पती-पत्नी जोडपे तरुणांना इसिससाठी काम करण्यास प्रवृत्त करत असल्याचे उघड झाले होते.

या काश्मिरी दाम्पत्याची चौकशी केली असता पुण्यातील एक तरुणी या दोघांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. नबील सिद्दीक खत्री हा या तरुणीच्या संपर्कात होता. आता मिळालेली माहिती अशी की, तलहा खानही या नबील सिद्दीक खत्रीच्या संपर्कात होता.

या आधारे एनआयएने तलहा खानच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. या तपासानंतर एनआयए आणखी काही लोकांपर्यंत पोहोचू शकते असे सांगण्यात येत आहे. या अटकेनंतर शहरात पुन्हा एकदा इसिसचा स्लीपर सेल सक्रिय झाल्यामुळे पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
तुमच्याकडे कार असो वा बाईक, १ एप्रिलपासून या झटक्यासाठी राहा तयार, खिशावर येणार ताण
शाहरूखने मारला मोठा हात, पठाण चित्रपटासाठी दिपीका आणि शाहरूखने घेतली तब्बल ‘एवढी’ फी
Russia Ukraine war: मोदींचा तो फोटो पुन्हा होतोय व्हायरल, पुतिन यांच्यामागे हात बांधून उभे आहेत मोदी

राज्य

Join WhatsApp

Join Now