Share

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसलेंना सीबीआयने केली अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण

राज्यभरात मोठमोठ नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घरावर केंद्रीय यंत्रणांचे छापे पडत असतानाच पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. (pune businessman avinash bhosle arrested)

डीएचएफएल प्रकरणात ३००० कोटींपेक्षा जास्तची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परीसरातील मालमत्तेवर सीबीआय छापेमारी करत होती. त्यानंतर आता त्यांन अटक करण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांना येस बँक आणि डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुरुवारी अटक केली आहे. भोसले यांच्या घरावर एप्रिल महिन्यातच सीबीआयने छापे घातले होते. तर मागील वर्षी सीबीआयने अविनाश भोसले यांची ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त केली होती.

गेल्या काही वर्षांपासून येस बँक आणि डीएचएफएल प्रकरणी सीबीआय तपास करत आहे. याप्रकरणी जे कोणी संशयित आढळून येत आहे, त्यांची सीबीआय चौकशी करत आहे. याआधी सीबीआयने संजय छाब्रिया यांना याप्रकरणी अटक केली होती.

तसेच संजय छाब्रिया यांच्यासोबतच सीबीआयने विनोद गोएंका आणि शाहिद बलवा यांच्यावरही कारवाई केली होती. याचवेळी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसले यांचेही नाव समोर आले होते. त्यानंतर सीबीआयने अविनाश भोसले यांची चौकशी करण्यास सुरुवात केली होती.

याप्रकरणी अविनाश भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर सीबीआयने एप्रिल महिन्यात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून सीबीआयने काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. अविनाश भोसले यांचे शहरातील डेक्कन आणि भोसलेनगरमध्ये प्रशस्त कार्यालय आहे. तर पाषाणमध्ये त्यांचे अलिशान निवासस्थान आहे.

महत्वाच्या बातम्या-
भाजप नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच शिवसेनेचे खरे शत्रू; शिवसेनेच्या बड्या नेत्याचे धक्कादायक विधान
पंढरपूरचे मंदिर आधी बुद्ध विहार म्हणणाऱ्या दाव्यावर वारकरी संप्रदाय संतप्त, तर इतिहास संशोधक म्हणाले…
सलमानच्या नाकावर टिच्चून त्याच्यासमोर प्रचंड बोल्ड अवतारात मलायकाची हवा, सलमान बघतच राहीला…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now