राज्यात बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्यात आल्यापासून राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरवण्यात येत आहे. अशात अनेकजण बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत आहे. (pune bull race gift jcb, bullet, bolero)
अनेक ठिकाणी विजेत्यांना चांगले बक्षीसही देत आहे. पण आता एक अशी बातमी समोर आली आहे, जी राज्यातच नाही, तर देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. आता देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ही पुण्यात होणार आहे. या बैलगाडा शर्यतीसाठीची टोकन बुक प्रक्रिया सुरु झाली आहे.
अशात फक्त तीनच तासात दोन हजारांहून अधिक बैलगाडा मालिकांनी टोकन नोंदणी केली आहे. एवढ्या कमी वेळात इतक्या मोठ्या प्रमाणात नोंदी होणारी ही बैलगाडा शर्यत इतिहासात पहिली ठरली आहे. आतापर्यंत इतक्या वेगाने कधीच नोंदी बघायला मिळालेल्या नाहीये.
पिंपरी-चिंचवडमध्ये ही भव्य बैलगाडा शर्यत होणार आहे. या बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी खुपच उत्सुक आहे. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहूल जाधव यांच्या पुढाकाराने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ ते ३१ मे दरम्यान होणारी ही बैलगाडा शर्यत देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत असणार आहे. त्यामुळे देशासह राज्यातील इतर दिग्गज नेत्यांचीही इथं हजेरी लागणार आहे. तसेच सर्वात मोठी बैलगाडा शर्यत असल्यामुळे याचे बक्षीसही आश्चर्याचा धक्का देणारे आहे.
अठ्ठावीस लाखांचा जेसीबी, एक बोलेरो, अकरा लाखांचे तीन ट्रॅक्टर, साडेतीन लाखांच्या दोन बुलेट अन् ८० लाखांच्या ११४ दुचाकी असे बक्षीस ही शर्यत जिंकणाऱ्या विजेत्यांना मिळणार आहे. यासाठी बैलजोड्यांना पिंपरी चिंचवडचा बैलगाडा घाट मारावा लागणार आहे. तब्बल दीड कोटींच्या घरात बक्षीसांची रक्कम जाणार असल्याने ही देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
IPL स्पर्धेतून बाहेर पडताच सुट्टी सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा, पत्नीसोबतचे रोमॅंटिक फोटो व्हायरल
एकेकाळी वेबसिरीजमधील बोल्ड भूमिकांवर टिका करणारी प्राजक्ता माळी आता मात्र स्वताच…
पुणे हादरलं! प्रियकरासोबत मिळून आपल्याच पोटच्या बाळाला कोंबलं शौचालयाच्या भांड्यात