‘हर हर महादेव’च्या जयघोषाने पावनखिंड हा ऐतिहासिक चित्रपट १८ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरु असतानाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सोशल मीडियावर सध्या पावनखिंड चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. चित्रपटासंबंधित अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. यादरम्यान सध्या सिनेमागृहातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसत आहे की, पावनखिंड चित्रपट सुरु होताच काही युवक शिवगर्जना देत आहेत. हिस्ट्री (History) नावाच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करत लिहिण्यात आले की, पावनखिंड चित्रपट चालू होताच थेटर मध्ये क्षत्रिय परिवार सांगली या समुहाने दिली शिवगर्जना. ३६ सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमच्याही अंगावर काटा येईल.
सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २ लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३० हजारापेक्षा अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहेत. तसेच अनेकजण भरभरून कमेंट करत पावनखिंड चित्रपटाचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, पावनखिंड हा चित्रपट म्हणजे दिग्पाल यांनी संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील तिसरं पुष्प आहे. यापूर्वी दिग्पाल यांच्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिखस्त’ या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. तर आता पावनखिंड या चित्रपटाद्वारे ते प्रेक्षकांना पावनखिंडीचा थरार दाखवत आहेत.
बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत गनिमांची वाट रोखून धरण्यासाठी आपल्या प्राण्यांचीही आहुती दिली होती. बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झाल्यामुळे या खिंडीला पावनखिंड असे नाव देण्यात आले. तर पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेल्या लढ्याचा थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आल्मंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. तर अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. यासोबतच चित्रपटात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, असे अनेक कलाकारसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: निवेदिता सराफ यांनी बनवली लक्ष्याची सगळ्यात आवडती डिश, म्हणाल्या, “माझा जिवलग मित्र..”
गार्डनिंगच्या एका आठवड्याच्या कोर्सने बदलले आयुष्य, घरीच केली सर्व भाज्यांची लागवड
केबीसीच्या नावाखाली ९० लाखांचा फ्रॉड, ‘ही’ युक्ती वापरून नागरिकांना गंडवायचा, वाचूुन अवाक व्हाल
भर पत्रकार परिषदेत ‘या’ प्रश्नावर अजितदादा भडकले; “आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”