Share

अंडरवर्ल्डच्या धमक्यांमुळे सगळ्यांची फाटली होती पण एकटी प्रिती निडरपणे उभी होती, वाचा किस्सा

बॉलिवूडचे आणि अंडरवर्ल्डचे नाते काही जुने नाही. हे सर्वांना माहिती आहे की अंडरवर्ल्डशी बॉलिवूडकरांचे खुप जवळचे संबंध होते. सिनेमाची व्याप्ती जसजशी वाढत गेली असली तरी यामागे कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडायचा. हळूहळू बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील कनेक्शन बाहेर आलं होतं. (priti zinta was not afraid of underworld threats)

संजय दत्त, सलमान खान, ऋषी कपूर या अभिनेत्यांची नावं यामध्ये अग्रस्थानी होती. आता नेपोटीझम ही संकल्पना काही नवीन नाही. काम पाहिजे असेल तर कुठल्या ना कुठल्या ग्रुपमध्ये सामिल व्हावं लागतं. स्टार किड्सचं बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी हा मार्ग खुप सोप्पा असतो.

याच बॉलिवूडमध्ये जर कोणी एकमेकांच्या विरोधात बोललं तर त्याला बॉयकॉट केलं जातं हे ही तितकंच खरं आहे. जसं सुशांत सिंग राजपुतसोबत घडलं होतं तसंच काहीसं प्रिती झिंटासोबतही घडलं होतं. हे खुप कमी लोकांना माहिती आहे. त्यावेळी नेमकं काय झालं होतं हे जाणून घेणार आहोत.

चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटात वैश्याची भूमिका साकारून प्रितीने आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. पण हे खुप कमी लोकांना माहिती आहे की हा चित्रपट अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळं खुप गाजला होता. पोलिसांना या सगळ्याची माहिती मिळाली आणि त्यांनी चित्रपटातल्या कलाकारांची चौकशी करायला सुरूवात केली.

सलमानसोबत, राकेश रोशन, शाहरूख खान, अनिस बाजमी, महेश मांजरेकर अशी मोठी नावं या प्रकरणात अडकली होती. पोलिसांनी खोलवर चौकशी केली पण त्यांना काहीच पुरावा सापडला नाही. अंडरवर्ल्ड सोबत आपले कोणतेही संबंध नाहीत असे सगळ्यांनी सांगितले. प्रीतीने मात्र न घाबरता सगळं काही सांगून टाकलं होतं.

कोर्टातही तिने आपले शब्द फिरवले नाहीत. तिने साक्ष देताना सांगितलं होतं की मला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. तसेच माझ्याकडे ५० लाखांची खंडणी देखील मागण्यात आली होती. त्यावेळी कमिश्नर होते एम एन सिंग. त्यांनी प्रितीच्या संरक्षणासाठी पोलिसांची फौज उभी केली होती.

प्रितीने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, या काळामध्ये अंडरवर्ल्ड खुप सक्रिय झाले होते. राकेश रोशन यांच्यावरही हल्ला झाला होता. त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सेटवरचे वातावरण खुप तणावाचे असायचे. सर्वजण अंडरवर्ल्डच्या धमक्यांपासून वाचण्यासाठी आपले फोन बंद करून ठेवायचे.

माझ्या आयुष्यातील तो सर्वात भितीदायक काळ होता, असा खुलासा प्रितीने केला होता. प्रिती नेहमी आपल्या शब्दांवर ठाम राहिली. सिनेमातून तिने थेट क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले. किंग्स इलेव्हन पंजाब संघाची ती सध्या मालकीण आहे. २०१६ साली तिने लग्न केले होते. तिचा पती मुळचा अमेरिकेचा आहे.

चित्रपटात क्युट दिसणारी प्रिती खऱ्या आयुष्यात इतकी निडर असेल हे कोणालाही माहिती नव्हते. कदाचित तुम्हालाही आताच माहिती पडले असेल. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
..जेव्हा मायकल जॅक्सनने राज ठाकरेंना दिले होते तब्बल ४ कोटी रुपये, वाचा पुर्ण किस्सा
प्रियंका चोप्राने शेअर केला युक्रेनमधील परिस्थितीचा भावनिक व्हिडीओ, हल्ल्याच्या निषेध करत म्हणाली..
कोण आहे अजय पुरकर ज्यांनी साकारली आहे बाजी प्रभूंची भूमिका? वाचा भूमिकेमागची कहाणी
“मोदीजी निवडणूक प्रचार थांबवून लवकरात लवकर आपल्या देशातील मुलांना मायदेशी घेऊन या”

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now