देशातील 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींचे निकाल गुरुवारी हाती आले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election 2022 Result) योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्यावर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाने (BJP) बंपर विजय मिळवला आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 273 जागा जिंकण्यात यश आले.
मात्र या निवडणुकीत कॉंग्रेसला जबर धक्का बसला. गोव्यातही काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असून काँग्रेस बसपाच्याही मागे पडला आहे. या सर्व निकालांनंतर आता कॉंग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे.
याचाच धागा पकडत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. तसेच या निवडणुकीत नेमकं आपण कुठे मागे पडलो? यामागचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसने घेतलेले काही निर्णय लोकांना आवडले नाहीत. लोकांनी त्याचा राग काँग्रेसवर काढला, असे म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, निकालावर प्रदीर्घ चर्चा करणे गरजेचे असून, काँग्रेसला नेतृत्व मिळाले पाहिजे. आम्ही २३ जणांनी पत्रात जे मुद्दे उपस्थित केले होते. त्यावर गंभीर चर्चा व्हायला हवी. राजकीय पक्षाला संघटन मजबूत करायला हवे. त्याबाबत काँग्रेस कमी पडली.’
तसेच ‘बहुमत मिळूनही गोव्यात मागील वेळी सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे अनेकजण भाजपत गेले. पंजाबमध्ये नेतृत्वबदलाच्या घटना घडत गेल्या. जातीय धोरणावर समीकरणे बदलत गेली. जी काँग्रेसच्या मूळ धोरणात नव्हती. काँग्रेस नेतृत्त्वाची जी पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे असे निकाल लागल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी पाच राज्यांतील काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर ट्विट करून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. जनतेचा निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यातून आम्ही शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
PHOTO : राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील पतीसमोर गुरूनाथही पडेल फिका, वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी
‘खलिस्तानी समर्थकांच्या मदतीने ‘आप’ने पंजाब निवडणुकीत विजय मिळवला’, शीख ऑफ जस्टीसच्या आरोपाने खळबळ
“शरद पवार फक्त ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ नाहीत, फडणवीस असले १०-२० पवार खिशात घालून फिरतात”
ठाकरे सरकार धोक्यात? थेट पंतप्रधानांनीच दिले मिशन महाराष्ट्राचे संकेत; म्हणाले…