Share

रोहित शर्मापेक्षा घातक असलेल्या युवा फलंदाजाला BCCI ने डावलले; कारकीर्द संपण्याच्या मार्गावर?

rohit shrma

भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून लखनऊमध्ये खेळवला जाणार आहे. टी-२० मालिकेनंतर २ सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. (prithvi shaw is not selected team)

श्रीलंकेविरुद्ध पहिले तीन टी-२० सामने २४, २६ आणि २७ फेब्रुवारीला तर २ सामन्यांची कसोटी मालिका ४ मार्चपासून खेळवली जाणार आहे. अशात बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाचे सिलेक्टर्स एका खेळाडूला खूपच दुर्लक्षित करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी निवड समिती त्या खेळाडूला नक्कीच संधी देतील, अशी अपेक्षा होती. पण असे झाले नाही.

निवड समितीने दुर्लक्षित केलेला हा खेळाडू रोहित शर्मापेक्षाही फलंदाजीत तरबेज आहे. या खेळाडूकडे निवड समितीचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा धमाकेदार सलामीवीर पृथ्वी शॉ आहे. पृथ्वी शॉच्या फलंदाजीच्या शैलीत सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागचा कॉम्बो पाहायला मिळत असतो.

सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही सुरुवातीच्या षटकांत दहशत निर्माण केली आणि जोरदार धावा लुटल्या. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते की, पृथ्वी शॉमध्ये सेहवाग, सचिन आणि लाराची झलक आहे. २२ वर्षीय युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा आक्रमक फलंदाज आहे.

पृथ्वी शॉला जास्तीत जास्त संधी मिळाल्यास तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात धावा करू शकतो. पृथ्वी शॉसारख्या भक्कम सलामीवीराकडे निवड समिती सातत्याने दुर्लक्ष करत आहे. पृथ्वी शॉ सध्या जगातील सर्वात धोकादायक युवा फलंदाजांपैकी एक आहे. पण तरीही निवडकर्ते पृथ्वी शॉला सतत बाहेर ठेवत आहेत.

टीम इंडियाला आगामी काळात नव्या सलामीच्या फलंदाजाची गरज भासणार आहे. युवा फलंदाज पृथ्वी शॉ ही जबाबदारी सांभाळू शकतो. शॉच्या बॅटने देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये जी खळबळ माजवली आहे, ते संपूर्ण जगाने पाहिले आहे. अवघ्या २२ वर्षांचा हा फलंदाज टीम इंडियाचे भविष्य आहे. त्याने त्याच्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत.

महत्वाच्या बातम्या-
भन्नाट ऑफर! पावनखिंड पाहणाऱ्यांना मिळणार मिसळवर डिस्काऊंट, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला..
वारं पठ्ठ्या! मार्कशीटमधील एका गुणासाठी बोर्डाला खेचलं हायकोर्टात, तीन वर्षांनी आला ‘हा’ निकाल
‘फडणवीस दाम्पत्यांविरुद्ध ३ वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार, अद्याप कुणालाही बोलावले नाही’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now