Share

..अन् डोहाळे जेवणादिवशीच पत्नीने चाकूने वार करून पतीचा केला खून, कारण वाचून बसेल धक्का

murder

पती पत्नीमध्ये कशावरून वाद होईल काहीही सांगता येत नाही. चिकागोमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती पत्नीमध्ये वाद झाला आणि पत्नीने थेट पतीचा खुनच केला. केशिया गोल्डन या ३३ वर्षीय महिलेने तिचा प्रियकर कॅल्विन सिडनी याची डोहाळे जेवणाच्या दिवशीच हत्या केली.

त्यांच्यात डोहाळे जेवणावरून घरी आल्यावर पहाटे तीन वाजताच्या सुमारास जोरदार वाद झाला. त्यांच्या राहत्या घरात मायक्रोवेव्ह वापरण्यावरून त्यांच्यात वाद झाल्याची माहिती शिकागो सन-टाइम्सने दिली आहे. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आठ महिन्यांची गरोदर असलेल्या गोल्डनने बॉयफ्रेंड कॅल्विनच्या हातातील प्लेट खाली पाडली.

त्यानंतर रागाच्या भरात कॅल्विनने तिला ओट्यावर ढकललं. त्यावेळी त्यांचे काका तिथेच उपस्थित होते. त्यांनी या दोघांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोघांना वेगळं केलं. त्यानंतर कॅल्विन रागारागात बेडरूममध्ये गेला. तिथे गेल्यावर गोल्डनने चाकूने त्याच्या पायावर वार केला.

हल्ला केल्यानंतर गोल्डनने चाकू तिथेच टाकला आणि घरातून पळ काढला. कॅल्विनला जवळच्या माऊंट सिनाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. पण तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही तासांनंतर गोल्डन घरी परतली पण तिला याबद्दल काहीच माहिती नव्हते.

कॅल्विन मृत्युमूखी पडला आहे हे कळताच तिला धक्काच बसला.  गोल्डनची आई तारशा एलिस या म्हणाल्या की, तिला कोणाचाही जीव घ्यायचा नव्हता. आपण कोणाच्यातरी पायावर वार केल्यावर तो मरू शकतो याची तिला कल्पना नव्हती. त्याने तिथून निघून जावं अशी गोल्डनची इच्छा होती.

तिला बाळाची काळजी होती, बाळाला दुखापत होऊ नये याचीही तिला काळजी होती. तो जात नसल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं आणि ही घटना घडली, असं म्हणत आईने गोल्डनची बाजू घेतली आहे. गोल्डननला  पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादामध्ये गोल्डनही जखमी झाली होती त्यामुळे तिच्यावरही चार दिवस उपचार करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या
narendra modi : ब्रेकींग! महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कायमचा सुटणार; थेट मोदींची मध्यस्थी, कोल्हापूरात मोठ्या घडामोडी
sanjay shirsat : शिंदेगटातील मेन मास्टरमाईंट पुन्हा शिवसेनेत येणार; बड्या नेत्याच्या दाव्याने राज्यात भूकंप
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now