Share

पुण्याच्या उद्योगक्षेत्राला मोठा धक्का! प्रसिद्ध ‘प्रवीण मसाले’चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे निधन

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध प्रवीण मसालेवाले या ब्रँडचे संस्थापक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांचे निधन झाले आहे. वृद्धपकाळामुळे वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. पुण्यातील सुप्रिद्ध व्यवसायिक म्हणून त्यांची ओळख होती. (pravin malasalewale hukmichand chordia death)

प्रवीण मसालेवाला या ब्रँडचा जन्म हुकमीचंद चोरडिया यांच्यामुळेच झाला होता. मसाल्यांच्या क्षेत्रात त्यांनी ४० वर्षांहून अधिक वर्षे काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चोरडिया कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

आजकाल प्रवीण मसाले हे घराघरात पोहोचले आहे. पण या सर्वांमध्ये हुकमीचंद चोरडिया यांचा सिंहाचा वाटा आहे. अशात हुकमीचंद चोरडिया यांच्या निधनामुळे व्यवसाय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक उद्योपतींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हुकमीचंद चोरडिया हे मूळचे पुण्याचे नव्हते. ते मूळचे पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील होते. त्यांच्या पत्नीने मसाले विकण्याची कल्पना त्यांना सांगितली होती. पत्नीच्या कल्पनेतूनच त्यांनी मसाल्यांचा कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला होता आणि प्रवीण मसाला घराघरात पोहोचवला होता.

हुकमीचंद यांचा जन्म अहमदनगरमध्ये झाला होता. ते एका मारवाडी कुटुंबात जन्मलेले होते. त्यांनी १९६२ साली प्रवीण मसाल्याची स्थापना केली होती. तिथूनच त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली होती. गेल्या ४० वर्षांहून अधिक त्यांनी मसाले उद्योगात काम केलेले आहे.

मारवाडी कुटुंबातून आलेल्या हुकमीचंद चोरडिया यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या जीभेची चव ओळखली होती. त्यानुसार ते मार्केटमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आणत होते. आता प्रवीण मसालेवाला हा ब्रँड फक्त राज्यातच नाही, तर देशातील वेगवेगळ्या भागात पोहोचला आहे.

महत्वाच्या बातम्या-
तिन्ही बाजूंनी केली फायरिंग, मग मृत्यु झाल्याचं केलं कन्फर्म, मुसेवालाच्या मित्रांनी सांगितला थरारक घटनाक्रम
PHOTO: मिया खलिफाने रेड बिकीनीमध्ये दाखवला हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते झाले बेकाबू
कश्मीरमधील परिस्थीती नियंत्रणाबाहेर; १८०० पंडीत, ३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी कश्मीर सोडले

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now