Share

दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात, तिन्ही अपघात सारखेच, घातपाताचा संशय आल्याने उचलणार ‘हे’ पाऊल

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे वेगवेगळ्या मुद्यांवरुन ठाकरे सरकारला घेरत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे, पण यावेळी कारण जरा वेगळेच आहे. प्रवीण दरेकरांच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे दरेकरांनी म्हटले आहे. (pravin darekar on car accident)

प्रवीण दरेकरांच्या गाडीचा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती एनएसजी कॅम्पजवळ अपघात झाला. या महिन्याभरात त्यांच्या गाडीचा तिसऱ्यांदा अपघात झाला आहे. तसेच हे तिन्ही अपघात एकसारखेच झाल्याचे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी असे म्हटले आहे.

तिन्ही अपघात मोटारसायकल स्वार अचानक समोर आल्यानेच झाले आहे. त्यामुळे माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांना देखील संशय येत आहे. आता याप्रकरणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे, असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे.

तसेच मी विरोधी पक्षनेता असल्याने मल राज्यभर फिरावं लागतं. परंतू अशापद्धतीने अपघात होत असल्याने मनात शंका निर्माण होत आहे. तिन्हीवेळा गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. पंधरा दिवसांपासून अपघाताची ही मालिका सुरुच असून आजचा हा प्रकार तिसऱ्यांदा झाला आहे. त्यामुळे मी चौकशी करणार आहे, असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेता असल्यामुळे राज्यभर फिरावं लागतं. तसेच अनेकदा हा प्रवास किती दिवस होईल हेही सांगता येत नाही. पण दरेकरांसोबत सुरु झालेली अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवरुन जात असताना त्यांच्या समोर अचानक दुचाकी आली, त्यामुळे त्यांच्या गाडीला अपघात झाला.

या अपघातावेळी गाडीत अनेक लोक प्रवीण दरेकरांसोबत होते. त्यामुळे सहकाऱ्यांना घातपाताचा संशय आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी गाडीचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी आता आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
एकनाथ खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका; ‘मी टरबुज्या म्हणणार नाही, पण…’,
शोपियाँमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत सांगलीच्या सुपूत्राला वीरमरण, २३ व्या वर्षी झाला शहीद
पुरुषांच्या शारीरीक कमजोरीवर मात करण्यासाठी ‘हा’ मसाला असतो खुपच फायदेशीर, जाणून घ्या फायदे

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now