निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या हातातून नाव आणि चिन्ह गेल्यामुळे आता त्यांना नव्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढावी लागण्याची शक्यता आहे.
चिन्ह आणि नाव ठाकरे गटाला न देता शिंदे गटाला दिल्यामुळे शिवसैनिक खुप संतापले आहे. अनेक शिवसैनिकांनी चिन्ह आणि नाव कोणाचेही असो शिवसेना ही ठाकरेंचीच असणार असे म्हटले आहे. अशात नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शिवसैनिकाचा मृत्यू झाला आहे.
ठाकरेच आमचा पक्ष आणि ठाकरेच आमचे चिन्ह अशी पोस्ट त्याने केली होती. ती त्याची शेवटची पोस्ट ठरली आहे. सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. प्रवीण दत्तात्रय अनभुले असे त्याचे नाव असून तो ३२ वर्षांचा होता. त्याचा अचानक जाण्याने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रवीण हा मुळचा कर्जत तालुक्यातील घुमरी गावचा आहे. नोकरीनिमित्त तो नगरमध्ये राहत होता. नुकतेच त्याचे लग्न झाले होते. प्रवास आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा लोकांशी चांगला संपर्क झालेला होता. सोशल मीडियावरही त्याची ओळख खुप चांगली होती.
प्रवीण हा उद्धव ठाकरे यांचा कट्टर समर्थक होता. नुकताच निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला मिळणार असल्याचा निर्णय दिला. अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत होते. प्रवीणने सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करुन आपली प्रतिक्रिया दिली होती.
ठाकरे सांगतील तोच आमचा पक्ष आणि ठाकरे सांगतील तेच आमचे चिन्ह. ठाकरे नावाशिवाय शिवसेना नाही, अशी पोस्ट प्रवीणने केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्याच्यावर त्याच्या मूळगावी अंतिम संस्कार करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज्याच्या राजकारणाला पुन्हा मिळणार वेगळे वळण; आदित्य ठाकरेंचे फडणवीसांबद्दल मोठे विधान, म्हणाले…
उद्धव ठाकरेंनी ‘ती’ चुक केली नसती तर सरकार पडलं नसतं; सरन्यायाधीश स्पष्टच बोलले