मागील चार दिवसांपासून राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील आणि शिंदे गटाचे वकील आपआपल्या पद्धतीने युक्तिवाद करत आहे. आता हे प्रकरण निर्णायक टप्प्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाकरे गटाच्या वकिलांकडून वेगवेगळे युक्तिवाद केले गेले असले तरी सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्यामुळेच सरकार कोसळल्याचे मत नोंदवले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यामुळे सरकार कोसळल्याचे सरन्यायाधीशांचे म्हणणे आहे.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर काही दिवस वाट बघितली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याची संधी होती. तसेच जर ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर ती बहुमत चाचणी रद्द ठरवली असती, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात ५ सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहे. बहुमत चाचणी, शिंदे गटाचे आमदार, राज्यपालांची भूमिका या गोष्टींवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद पाहायला मिळाला.
महाविकास आघाडी सरकार पडण्याला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे जायला हवे होते. तुम्ही गेला असता आणि ३९ आमदारांमुळे हरला असता तर आम्ही ती बहुमत चाचणी रद्द केली असती, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.
तसेच यावेळी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही काही आरोप करण्यात आले आहे. शिवसेनेचीच सत्ता असताना शिवसेनेचेच आमदार सत्ता कशी पाडू शकतात? शिवसेनेचे आमदार अविश्वास प्रस्ताव कसे आणू शकतात? राज्यपालांनी नियम डावलून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
तापाने फणफणलेली हरमन जिवाच्या आकांताने लढली पण दीप्तीच्या चूकीने फेरले पाणी; भारताचे स्वप्न भंगले
6 महाल, 100 कोटींच्या संपत्तीचा मालक होता हैदराबादचा निजाम; वाचा आता कोणाला मिळणार ही संपत्ती
उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा धक्का; शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडेच राहणार