राज्यात काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
अशातच पुन्हा एकदा शिवसेनेला ईडीचा दुसरा जबर धक्का बसला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11.36 कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत.
सरनाईक यांच्यावर झालेल्या या कारवाईने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान ईडीच्या कारवाईसंबंधी नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी प्रताप सरनाईक विधानभवानात पोहोचले होते. जप्तीची कारवाई केल्यानंतर ते प्रथमच त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या अनेक लोकप्रतिनिधींवर ही कारवाई सुरु आहे. पण माझा न्यायालयावर विश्वास आहे. NACL हे काय आहे, हेसुद्धा मी तपासणार आहे. ईडीच्या प्रक्रियेला मी सहकार्य करत आहेत. त्यांनी दिलेल्या नोटिशीविरोधात मी न्यायालयात दाद मागणार आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘ईडीकडून मला आठवड्याभरापूर्वीच नोटीस पाठवण्यात आली होती. तीस दिवसांच्या आतमध्ये मी अपील करणार आहे. कोर्ट जो निर्णय देईल त्याच्या अधीन राहून पुढील कारवाई होईल,” असं प्रताप सरनाईक यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, “गेल्या आठवड्यात मला जप्तीची नोटीस मिळाली होती. वस्तुस्थिती अधिकृतरित्या कळावी म्हणून मी आज येथे आलो आहे. हिरानंदानी इस्टेट येथील माझं राहतं घर. मीरा रोड येथील २५० मीटरची जमीन अशी ११ कोटी ३५ लाखांची संपत्ती जप्त करण्याची नोटीस मला पाठवली आहे. याप्रकरणी कोर्टात दाद मागण्याचा मला हक्क आहे,” असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
‘त्या’ प्रकरणाची लक्षवेधी विधानसभेत न लावल्याने आमदार सुनील शेळकेंना कोसळले रडू, म्हणाले..
‘गंगूबाई काठियावाडी’ पाहण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्याने उचलले ‘हे’ पाऊल; बायकोही झाली थक्क
या चित्रात तुम्ही पहिल्यांदा काय पाहिले? त्यावरूनच कळेल तुमचे व्यक्तीमत्व कसे आहे? क्लिक करा आणि जाणून घ्या…
शिवसेनेला दुसरा झटका देत ईडीने प्रताप सरनाईकांची ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती केली जप्त, उडाली खळबळ