Share

Prashant Kishor : नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करणार; प्रशांत किशोर यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

prashant kishor nitish kumar

prashant kishor shocking statement on nitish kumar  | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपच्या संपर्कात आहेत आणि परिस्थितीनुसार मागणी केल्यास ते भाजपशी पुन्हा जुळवून घेऊ शकतात, असा दावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बुधवारी केला. प्रशांत किशोर सध्या बिहारमध्ये पदयात्रेवर आहेत. प्रशांत किशोर यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश म्हणून या पदयात्रेकडे पाहिले जात आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, नितीश कुमार यांनी जेडीयूचे खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्यामार्फत भाजपसोबत जाण्याचा पर्याय खुला ठेवलेला आहे. त्यांचा पक्ष जेडीयूने मात्र हा दावा फेटाळून लावला आणि नितीश कुमार पुन्हा कधीही भाजपशी हातमिळवणी करणार नसल्याचे पक्षाने सांगितले आहे.

प्रशांत किशोर म्हणाले आहे की, ज्यांना असे वाटते की नितीश कुमार सक्रियपणे भाजपच्या विरोधात राष्ट्रीय आघाडी तयार करत आहेत, त्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांनी भाजपसोबत जाण्याचा पर्यायही ठेवला आहे. ते त्यांच्या पक्षाचे खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या माध्यमातून भाजपच्या संपर्कात आहेत.

पुढे ते म्हणाले की, जेडीयूने भाजपशी संबंध तोडले असले तरी या कारणास्तव हरिवंश यांना त्यांच्या राज्यसभा पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आलेले नाही. तसेच कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात आणि त्यांच्यासोबत मिळून ते काम करु शकतात. हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.

या वक्तव्यानंतर जनता दलाने (युनायटेड) किशोर यांना उत्तर दिले आहे. पक्षाचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी सांगितले की, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे जाहीर केले आहे की ते आयुष्यात कधीही भाजपशी हातमिळवणी करणार नाहीत. त्यागी म्हणाले की, आम्ही त्यांचे दावे फेटाळतो. नितीश कुमार ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत आणि प्रशांत किशोर सहा महिन्यांपासून. किशोर यांनी संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी २ ऑक्टोबर रोजी पश्चिम चंपारण येथील भितिहारवा येथील गांधी आश्रमातून आपली पदयात्रा सुरू केली होती. बिहारमधून ३५०० किलोमीटरचा प्रवास पुढील १२-१५ महिन्यांत पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. तसेच व्यवस्था बदलण्यासाठी ते लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

२०१८ मध्ये नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांचा JDU मध्ये समावेश केला होता आणि काही आठवड्यातच त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर CAA-NPR-NRC वादावरून नितीश यांच्याशी किशोर यांचे भांडण झाले होते. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : त्यावेळी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन ढसाढसा रडले अन् म्हणाले की…; आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा
bachchu kadu : शिंदे-भाजप सरकारमध्ये पडली मोठी फुट? दोन्ही मित्रपक्षांचे एकमेकांवर गंभीर आरोप, म्हणाले फक्त पैशासाठी…
Jayant patil : ‘शिंदेगटात गेलेल्या आमदारांना पश्चाताप होतोय अन् ते आता परत शिवसेनेत यायचा विचार करत आहेत’

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now