कथित ऑडिओ क्लिपमध्ये आमदार बंब एका सरकारी शाळेतील शिक्षकाशी बोलताना दिसत आहेत. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये हा शिक्षक आमदार बंब यांना सरकारी शाळेत कशी दुरावस्था आहे, कोणकोणत्या समस्या आहेत, हे सांगत आहे. त्यावर आमदार बंब त्यांना आरेरावीची भाषा वापरताना दिसत आहेत. “मी काय बोलवं हे तुम्ही मला सांगू नका”, असं ते या शिक्षकाला सांगत आहेत.
त्यावर बंब यांनी म्हंटलं आहे की, मग तुम्हा शिक्षकांना काही लाज वाटत नाही का? असं प्रतीसवाल बंब यांनी त्या शिक्षकाला केला. बंब म्हणाले की, तुम्ही यासाठी जबाबदार आहात असे म्हंटल्यावर शिक्षक म्हणाला तुम्ही आमदार आहात तुम्हालाच लाज वाटायला हवी, सरकार आम्हाला काम करू देत नाही असे शिक्षकाने उत्तर दिले.
तसेच आता या प्रकरणाबद्दल एक नवीन माहिती समोर येत आहे. शिक्षकाच्या पत्नीनेही प्रशांत बंब यांना झापल्याची माहिती समोर आली आहे. तुमचं विधानसभेतील भाषण ऐकल्यावर मला तेव्हा हाय क्वालिटीची शिवीच आठवली, त्यावेळी मी ती घातलीही, असे या महिलेने म्हटले आहे.
दरम्यान, प्रशांत बंब हे देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ‘महिला म्हणून मी तुमचा आदर ठेवतोय. तुम्ही महिला असल्याचा फायदा उठवून एका पुरुषाचा छळ करत आहात. मी याविरोधात तक्रार करेन, असे प्रशांत बंब यांनी स्पष्टच सांगितलं आहे. यामुळे आता प्रकरण आणखीनच वाढलं असल्याच पाहायला मिळत आहे.
पुढे प्रशांत बंब यांनीही शिक्षकाच्या पत्नीला झापताना म्हंटलं आहे की, तुम्ही जनतेचा पैसा खाऊन फुकटचा पगार घेता. मुलांना शिकवत नाही, तुम्ही मुलं बरबाद केलेत आतापर्यंत. तुमच्या मिस्टरांना विचारा, शाळेत काय सुरु आहे, असे बंब यांनी म्हटले. सध्या ही नवीन ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी
AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…