Share

प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सापडलेली बॅग कोणी ठेवली? पोलीस तपासात झाला मोठा खुलासा

prsad lad

काही दिवसांपूर्वीच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली होती. भाजप आमदाराच्या घरासमोर एक बॅग सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मांटुंगा येथे राहणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरापुढे सापडलेल्या बॅगने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या बॅगेमध्ये सोने, चांदीच्या मूर्ती आणि रोख रक्कम आढळली होती. सध्या लाड यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. आता पोलिस तपासात या बॅग बद्दल मोठा खुलासा झाला आहे.

वाचा तपासादरम्यान काय झाले निष्पन्न..?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॅगेत सापडलेला सर्व ऐवज हा शेजारच्या इमारतीमधून चोरी करण्यात आला होता. लाड यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या बॅगमध्ये तीन वेगवेगळ्या पिशव्या होत्या. यामध्ये चिल्लर, सोने-चांदीचे दागिने, देवाच्या मूर्ती होत्या.

काही दिवसांपूर्वीच लाड यांच्या घराबाहेरून पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली होती. ती बॅग ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली. तपासासदरम्यान आजूबाजूच्या परिसराची पोलिसांनी तपासणी केली. या तपासादरम्यान पोलिसांना वेगळीच माहिती मिळाली.

लाड यांच्या घराबाहेर मिळालेल्या या बॅगमधील सर्व ऐवज शेजारील इमारतीमधील एका घरातून चोरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये सध्या कोणीही राहत नाही. याचाच फायदा पोलिसांनी उचलला. या घराच्या बाथरुममधून चोराने आत प्रवेश करत चोराने देवघरातील सामानाची चोरी केली.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे, लाड यांना मागील आठवड्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. लाड यांनी या बाबतची तक्रार पोलिसांत केली होती. सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता माझ्या जीवाला धोका असल्याच लाड यांनी पोलिसांना सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now