Share

गायीचं दूध व शेण विकून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला कमावतो तब्बल दीड कोटी; वाचा सांगोल्याच्या पठ्याची सक्सेस स्टोरी

Success Story: भारत (India) देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतात अनेक लोक शेती (Agriculture) करतात. अनेक शेतकरी दिवसरात्र कष्ट करुन आपल कुटुंब सांभाळत असतात. परंतु, शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून घर खर्च भागत नसल्याने ते जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय (Dairy Business) करतात.

विशेषतः ग्रामीण भागातील माणसांचे शिक्षणाचे खुप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांचा कल जास्तकरून शेती आणि दुग्ध व्यवसायाकडे असतो. आज आपण दुग्ध व्यवसायात (Dairy Industry) उंच झेप घेऊन लाखोंचा (Financial) नफा कमावणाऱ्या एका शेतकऱ्याचा प्रवास पाहणार आहोत.

सांगोला (sangola) तालुक्यातील इमडेवाडीच्या (imdevadi) प्रकाश इमडे (Prakash Imday) या शेतकऱ्यांने एखाद्या कार्पोरेट कंपनीलाही लाजवेल असा उद्योग केला आहे. इमडे यांनी दुध आणि शेतातून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. प्रकाश इमटे यांच्याकडे पहिल्यांदा फक्त एक गाय होती. आता त्यांच्याकडे तब्बल १५० गायी आहेत.

सगळ्या पहिल्यांदा जी गाय इमटे यांच्याकडे होती तिचा फोटो इमटे यांनी देव घरात लावला आहे. संपूर्ण इमटे कुटूंबीय सकाळी या गायीचा आशिर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करतात. इमटे यांनी खुप मोठा बंगला बांधला असुन त्यांनी त्या बंगल्याचे नाव ‘गोधन’ निवास असे दिले आहे. तसेच त्यांनी गायीचा आणि दुधाच्या किटलीचा पुतळा बंगल्यावर बसवला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

गावत प्रवेश कराताच इमटे यांचा बंगला सर्वांचे लक्ष वेधून घेतो. तसेच त्यांच्या मुक्त गोठ्याला भेट देण्यासाठी अनेक नागरिक लांबून येतात. चार एकर शेतीत प्रकाश नेमाडे यांनी दोन एकरमध्ये मुक्त गोठा आणि आपला बंगला बांधला आहे. उरलेल्या शेतात त्यांनी गायींसाठी चारा लावला आहे. प्रकाश इमटे यांनी १९९८ साली हा व्यावसाय सुरू केला आहे.

सुरुवातीच्या काळात पाणी नसल्यामुळे प्रकाश इमटे टॅंकरने पाणी आणत होते. सध्या त्यानी शेतात खूप मोठे शेततळे बांधले आहे. जनावरांना घरची वैरण पुरत नसल्यामुळे ते दुसर्‍या शेतकऱ्यांकडून वैरण विकत घेतात. त्यांना जवळपास रोज चार ते पाच टन हिरवा चार लागतो.

इमटे यांचा मुक्त गोठा खुप स्वच्छ असतो. याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे तीन बदके आहेत. ही बदके कायम शेताला वेढा देतात. तसेच ते गोठ्यात असणारी किडा मुंगी देखील खातात. त्यामुळे कधीही साप, नाग, विंचू , बेंडकुळ्या कुठेच दिसत नाहीत.

दरम्यान, बापूंची पत्नी सिंधुताई, मुलगा विजय, सुनबाई मेघरानी आणि नातू हर्षद हे सर्वच या गोठ्यात गायीची देखभाल करतात. २० वर्षांपासून प्रकाश इमटे एक दिवसही कधी गोठा सोडून बाहेर गेले नाही. तर प्रकाश यांची सुन एकटी तब्बल ५५ गायींच्या धारा काढते.

तसेच प्रकाश इमटे नेहमी नवनवीन प्रयोग करुन बघतात. त्यांनी सध्या गायी वाढवण्यापेक्षा कमी गायींपासून जास्त दुधासाठीचे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे. पूर्वी २५ लिटर दूध देणाऱ्या गायी ४० लिटरपर्यंत दूध देत आहेत. त्यांच्या हा गोठा पाहण्यासाठी अनेकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच प्रकाश इमटे हे तरुणांसाठी एक आदर्श शेतकरी ठरत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now