महाराष्ट्रातील जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी आपले संपुर्ण आयुष्य आदिवासींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी व्यतीत केले. त्यांच्याच आयुष्यात अंधार करणारी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ही बातमी त्यांच्या तब्येतीशी संबंधित, डॉ.प्रकाश आमटे यांना ‘हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सर’ असल्याचे निदान झाले आहे. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती. त्यामुळे मागील १० दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात अतिदुर्गम अशा भामरागडच्या हेमलकसात ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो आदिवासींच्या जीवनाला आधार देणाऱ्या सेवेच्या प्रकल्पाने डिसेंबर महिन्यापासुन ४९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटेंच्या प्रेरणेतून उभ्या असलेल्या या प्रकल्पातून डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटेंसह आमटे कुटुंबियांची चौथी पीढी ही या प्रकल्पातून आरोग्य, शिक्षण, शेती या कार्याच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देत आहेत.
कार्य
बाबा आमटेंनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हयात हेमलकसा इथं ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाची स्थापना केली होती. या शिवाय ते स्थानिक आदिवासींच्या विकासाकरता आणि आरोग्याकरता देखील कार्य करीत होते. विशेषतः बाबांनी कुष्ठरोग्यांकरता कार्य केलं, त्यांच्याकरता ‘आनंदवन’ची स्थापना केली. बाबांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात आज ही जवाबदारी डॉ. प्रकाश, पत्नी मंदाकिनी, आणि त्यांचे दोन चिरंजीव अनिकेत व दिगंत फार चांगल्या प्रकारे चालवत आहेत.
‘हेअरी सेल ल्युकेमिया कॅन्सर म्हणजे काय?
‘हेअरी सेल ल्युकेमिया’ हा ‘ कॅन्सर’ क्रोनिक या प्रकारात मोडतो. म्हणजे हा रक्त आणि अस्थिमज्जाचा एक दुर्मिळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. यात तुमच्या बी पेशी (लिम्फोसाइट्स)वर परिणाम करतो. एरव्ही या पांढऱ्या पेशी म्हणजे सैनिक पेशी शरीरातील रोगजंतुशी लढतात
पण, हेअरी सेल ल्युकेमिया झाल्यानंतर तुमचे शरीर असामान्य बी लिम्फोसाइट्सचे अतिरिक्त उत्पादन करते आणि या पेशी योग्यरित्या कार्य करत नाहीत. या असामान्य पेशी निरोगी बी, लिम्फोसाइट्सची जागा घेतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि तुम्हाला इतर संक्रमण होण्याची शक्यता असते. म्हणजेच अतिरिक्त निर्मितीमुळे रोग प्रतिकारक यंत्रणेत या पेशी तारक ऐवजी मारक ठरतात. या अतिरिक्त पांढऱ्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली केसासारख्या दिसतात. म्हणून त्यांना हेअरी सेल ल्युकेमिया म्हटले जाते.
महत्वाच्या बातम्या
धनंजय महाडिकांना खासदारकीसह ‘ही’ मोठी जबाबदारी मिळणार, भाजपच्या डोक्यात नक्की काय आहे प्लॅन?
फडणवीसांचा ‘तो’ आक्षेप बरोबरच; महाविकास आघाडीतील बड्या मंत्र्याने मान्य केली चूक
‘अशा भांडखोर बायका आम्हाला ७ जन्म तर काय पण ७ सेकंदही नको’; पुरूषांनी पिंपळाला उलट्या फेऱ्या मारून साजरी केली वटपोर्णिमा
पुणेकरांनो! वाहतुक पोलिसांना आता थेट दंड आकारता येणार नाही, ‘या’ पद्धतीने होणार कारवाई