pm narendra modi : राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून अनेक राजकीय घडामोडी घडतं आहेत. सध्या राज्याच्या राजकारणातील अनेक मुद्दे चर्चेत आहेत. राज्यात सत्तांतर होताच सत्ताधारी – विरोधकांमद्धे आरोप, प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. मात्र असं असलं तरी, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे चर्चेत नव्हते.
राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर प्रकाश आंबेडकर हे कोणतच राजकीय भाष्य करत नव्हते. मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करून आंबेडकर हे चांगलेच चर्चेत आले आहे.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. आंबेडकर म्हणतात, माझ्या भाषेत सांगायचं झालं, तर दारुड्याला जर दारू पिण्यासाठी पैसे मिळाले नाहीत, तर तो घरातली भांडी विकायला सुरुवात करतो.’
तसेच मोदी देशाचे पंतप्रधान जरी असले, तरी त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे. हे मी दोन वर्षांपूर्वी बोललो होतो. रिझर्व्ह बँकेने त्याला आता पुष्टी दिली आहे,’ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे. यावेळी पुढे बोलताना आंबेडकर यांनी रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या अहवालाचा उल्लेख केला.
आंबेडकर म्हणाले की, ‘दोन महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरने सादर केलेला अहवाल सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं आहे. मोदींना लक्ष करताना आंबेडकर म्हणाले, अंदाधुंद पद्धतीने तुम्ही सरकारी मालमत्ता विकत आहात. मात्र हे देशाच्या हिताचं नाही.’
दरम्यान, सध्या आपल्या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालू असं नमूद करताना पुढे आंबेडकर म्हणाले, शांतीसाठी नेहरुंनी कबुतरं सोडली होती. पण नेहरूंनी त्यांच्या वाढदिवस पाहून कबुतरं सोडली नाही. मात्र आपल्या पंतप्रधान मोदींनी वाढदिवस बघितला आणि चित्ता आणला, असा टोला आंबेडकरांनी लगावला.
Coins : चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला! 10 रुपयांची नाणी न स्वीकारल्याने युनियन बँकेला भरावा लागला दीडशे पट दंड
Shivsena : परवानगी मिळो ना मिळो दसरा मेळावा शिवतीर्थवरच होणार’, शिवसैनिक आक्रमक
terrorist : धक्कादायक! कराटेच्या क्लासेसमधून दिलं जातंय दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण, ‘या’ राज्यांचा आहे समावेश