Share

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला फोटो; म्हणाली, काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल ओकेमध्ये हाय!

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. या आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. (prajkata gaikwad share photo)

एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक मंत्रीही त्यांच्यासोबत सामील झाले आहे. तसेच त्यांच्या तिथे असणारे आमदार प्रसारमाध्यमांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. अशात एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू यांची ती ऑडिओ क्लिप आहे. त्यांच्या काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल ओके एकदम, या वाक्याची सध्या राज्यभरात चर्चा रंगली आहे. आपल्या माणदेशी भाषेमुळे शहाजीबापू चांगलेच चर्चेत आले आहे. तसेच नेटकरीही याची मजा घेताना दिसून येत आहे.

अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना या वाक्याला कॅप्शन म्हणून वापरले आहे. आता एका मराठी अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिनेही तिच्या फोटोला तेच कॅप्शन दिले आहे. काहीच तासात हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

https://www.facebook.com/100044434778524/posts/pfbid0q7qQfadXX8XHS6xPgEiWx1kxod7bDEQTEV4CbQkc9rdKy6bC3gxxM7LmtDDeVYxdl/?d=n

प्राजक्ता गायकवाडने हा फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोला तिने एकदम भन्नाट कॅप्शन दिले आहे. काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल ओकेमध्ये हाय! असे कॅप्शन तिने दिले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी तिचा फोटो लाईक केला आहे.

या फोटोवर अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिचे कौतूक केले आहे. तर काहींनी तिला सल्ला दिला आहे. खुपच सुंदर कॅप्शन दिले आहे, असे एकाने म्हटले आहे. तर एकाने खुप सुंदर दिसतेय असेही म्हटले आहे. तर काही लोकांनी तिला ताई राजकारणात पडू नका असा सल्ला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
२ लाखांची करकरीत रॉयल एनफिल्डची ‘ही’ बाईक फक्त २२ हजारात आणा घरी; वाचा भन्नाट ऑफर
रोहित शर्माच्या मुलीच्या ‘त्या’ बोबड्या बोलाने जिंकली सर्वांची मनं;म्हणाली, डॅडाला कोरोला झालाय, तिथं फक्त…
बंडखोर आमदारांना पश्चाताप होणार, पुढच्या निवडणूकीत ७६% शिवसैनिक जागा दाखवणार; सर्वेतून झाले उघड

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now