Share

गुटखा खाणं कठीण जात होतं म्हणून प्राजक्ता रोज करायची ‘हे’ काम; स्वत:नेच शेअर केला व्हिडिओ

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोज्वळ दिसणारी प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आलेली आहे. मराठी सिनेसृष्टीतील सर्वात बोल्ड वेबसिरिज प्रदर्शित झाली असून यात प्राजक्ता खुपच बोल्ड अवतारात दिसून आली आहे. (prajakta mali vanity video)

रानबाजार असे या वेब सिरिजचे नाव असून या सिरीजमधल्या तिच्या भूमिकेमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. या वेबसिरिजमध्ये प्राजक्ता माळीने महत्वाची भूमिका साकारली आहे. प्राजक्ताने या सिरीजमध्ये अतिशय बोल्ड भूमिका साकारत इंटिमेट सीन दिले आहे.

सत्य घटनांवर आधारित असलेल्या या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता माळीसोबत तेजस्विनी पंडित सुद्धा दिसून आली आहे. या सिरीजमध्ये दोघींनीही अतिशय बोल्ड सीन्स दिले आहे. या सिरीजमध्ये तिने रत्ना नावाच्या वेश्येची भूमिका साकारली आहे.

या वेबसिरीजमध्ये ती खुपच बिंधास्त आहे. त्यामुळे तिने अशा अनेक गोष्टी केल्या आहेत, ज्या तिने कधीच नाही केल्या. आता तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती व्हॅनिटीमध्ये बसून ती काहीतरी चघळताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना तिने म्हटले की, व्हॅनिटीमध्ये बसून बडीशेप खात मसाला गुटखा खाण्याची प्रॅक्टिस करताना. यादिवशी पहिल्यांदा मेकअप केला होता. सुंदर दिसण्यासाठी नाहीच अर्थात. यावेळी प्राजक्ताने एक फोटो देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.

तसेच तिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी प्राजक्ता म्हणाली होती की, मी बुधवार पेठेत गेले होते. कारण मला तिथे काम करणाऱ्या महिलांचं राहणीमान बघायचं होतं. त्यांचं वागणं, त्यांचं वावरणं याचा मला अभ्यास करायचा होता. तिथे जाऊन मला अनेक वेगळ्या गोष्टीही कळल्या आहे.

दरम्यान, रानबाजार ही वेबसिरीज अभिजित पानसे यांनी दिग्दर्शित केली आहे. ज्यावेळी या वेब सिरीजची घोषणा झाली होती, तेव्हापासून ही वेबसिरीज चर्चेत होती कारण ही मराठीतील सर्वात बोल्ड वेबसिरीज आहे. या वेबसिरीजचा शेवटचा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-
संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर संजय पवार निवडून आले असते’, छगन भुजबळ स्पष्टच बोलले
भाजपचा फार मोठा विजय नाही, ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या.., अमोल मिटकरींचा भाजपवर हल्लाबोल
महाडिकांच्या विजयाचे श्रेय फडणवीसांना देताना चंद्रकांत पाटलांना भावना अनावर, म्हणाले, मुंगी होऊन..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now