प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते. गेल्या काही महिन्यांपासून ती तिची बोल्ड वेबसिरीज रानबाजारमुळे चर्चेत होती. या वेबसिरीजमध्ये तिने प्रचंड बोल्ड सीन्स दिले होते. पण आता तिच्या ‘वाय’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. (prajakta mali share post about family)
प्राजक्ताचा वाय हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्राजक्ता सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट खुप थ्रिलर असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही दिला जात आहे. अशात या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ता या पोस्टमध्ये तिच्या कुटुंबियांचं कौतूक करत आहे. आई पप्पा – तुमचे किती आणि कसे आभार मानू? आम्हां मुलींच्या जन्माचं तुम्ही फक्त स्वागत नाही तर सोहळा केलात, चित्रपट पोहचला पाहिजे, जीव वाचला पाहिजे, असे कॅप्शन तिने पोस्टला दिले आहे. या पोस्टमध्ये तिने तीन फोटो शेअर केले आहे.
पहिल्या फोटोमध्ये प्राजक्ता आपल्या संपुर्ण कुटुंबासोबत दिसत आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोमध्ये ती आपल्या भाच्यांसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. प्राजक्ता माळीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टला आतापर्यंत २९ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
प्राजक्ताचा वाय हा चित्रपट स्त्रीभ्रुण हत्यावर आधारित आहे. गर्भलिंग निदान करणं कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडत आहे. त्या सत्य घटनांवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटावरद्वारे दिग्दर्शक अजित वाडीकर यांनी खुप वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.
वाय चित्रपटात मुख्य भूमिका मुक्ता बर्वेने साकारली आहे. तिच्या खास लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलिज झाला होता, तेव्हापासूनच हा चित्रपट खुप चर्चेत होता. पण आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
उदयपूर हत्या प्रकरणानंतर शरद पोंक्षेंचे खळबळजनक वक्तव्य; हिंदूंनो जागे व्हा…
राहूल गांधींच्या सर्वात जवळचा ‘हा’ बडा नेता काॅंग्रेस सोडण्याच्या तयारीत; मोदींबाबत म्हणाला…
राणादासाठी पाठकबाईंनी घेतला खास उखाणा; म्हणाली, फुलावर फिरत असतो भुंगा…