प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ती वेगवेगळ्या प्रकारचे लूक्स करत असते. बऱ्याचदा ती तिच्या चाहत्यांना साडीवर दिसून येते. पण गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आली आहे. (prajakta mali ranbazar bold look)
मराठी सिनेसृष्टीतील सर्वात बोल्ड वेबसिरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरिजमध्ये प्राजक्ता माळीने महत्वाची भूमिका साकारली आहे. पण नेहमीच तिच्या सोज्वळ रुपामुळे चर्चेत येणारी प्राजक्ता या सिरीजमध्ये अतिशय बोल्ड भूमिका साकारणार आहे.
प्राजक्ताची ही भूमिका पाहून तिच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसणार आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांची रानबाजार ही वेबसिरीज येणार आहे. सध्या या वेबसिरीजचा टीझर प्रसिद्ध झाला असून हा टीझर चांगलाच चर्चेत आला आहे.
https://www.instagram.com/p/Cdkkcv3AKO6/?utm_source=ig_embed&ig_rid=0b232618-14fa-41de-92d6-a391354ea729
हा टीझर पाहून अनेकांना धक्का बसला आहे, तर प्राजक्ताचे चाहते पण हा टीझर पाहून शॉक झाले आहे. हा टीझर पाहून हा मराठी सिनेसृष्टीतला अत्यंत बोल्ड टीझर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्य घटनांवर आधारित ही वेबसिरीज असणार आहे.
आता रानबाजार या वेबसिरिजचा टीझर प्राजक्ता माळीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये प्राजक्ता माळी अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहे. या टीझरमध्ये ती एक इंटिमेट सीन देताना दिसत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरु असल्याचे लक्षात येत आहे.
प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न, असे प्राजक्ताने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, देहू संस्थानने ‘तुका म्हणे’ शब्दांवर घेतला आक्षेप; प्रकरण पोलिसांत…
मला बोलण्याचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही का? कोर्टात केतकीचा युक्तिवाद, म्हणाली…
आदिनाथ कोठारे आणि उर्मिलामध्ये काही बिनसलंय? आदिनाथनेच केला खुलासा; म्हणाला…