Share

आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी अपेक्षा बाळगते, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत जी आक्रमक भूमिका घेतली आहे ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक दिवसांपासून या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे. नुकतीच राज ठाकरेंची औरंगाबाद येथे सभा पार पडली.

या सभेतही राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला आणि ४ तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता ३ तारखेनंतर काय होतंय? याकडे पुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या सर्व प्रकरणावर अनेक कलाकारांनीही आपली प्रतिक्रिया बोलून दाखवली आहे.

त्यामध्ये मराठी अभिनेत्री-अभिनेत्यांचाही समावेश आहे. नुकतंच प्राजक्ता माळीनं एक वक्तव्य केलं आहे जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्राजक्ताने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने अक्षय तृतीय्या आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शुभेच्छा देताना राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.

या पोस्टमध्ये प्राजक्ताने पारंपारिक वेशभुषा केलेली दिसत आहे. यासोबतच वर्तमानपत्रात आलेल्या एका लेखाचा फोटोही तिने शेअर केला आहे. या लेखात मशिंदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. ही पोस्ट शेअर करत ती म्हणाली की, सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो हीच प्रार्थना.

सगळ्यांना अक्षय्य तृतीयाच्या आणि मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. (आज सोने खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकते) असं तिने पोस्टमध्ये लिहीलं आहे. पुढे तिने भोंग्यांबाबत वक्तव्य केलं की, असो…, आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल असी अपेक्षा बाळगते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक धन्यवाद..

मा श्री राज ठाकरे सगळ्याचसाठी..परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूंच्या-महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचे तुमचं भाषण ऐकून ऊर अभिमानाने भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं? खुप खुप धन्यवाद, असं तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. तिच्या या पोस्टनंतर सोशल मिडीयावर चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या
राज ठाकरेंच्या भाषणावर औरंगाबाद पोलीस आयुक्त आजच कारवाई करणार; पोलीस महासंचालकांची माहिती
पुन्हा लंडनमध्ये धुमधडाक्यात लग्न करणार सोनाली कुलकर्णी; स्वत:च खुलासा करत म्हणाली..
Virajas Kulkarni & Shivani Rangole : शिवानी रांगोळेच्या हाताला लागली विराजसच्या नावाची मेहंदी; पहा खास व्हिडिओ
राज ठाकरेंच्या ‘त्या’ व्यक्तव्यानंतर मनसेत नाराजीचा सुर; आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा

ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण

Join WhatsApp

Join Now