Share

माझी आई माझ्यापेक्षा जास्त बोल्ड, ती माझ्याहून १० पावलं पुढं..; प्राजक्ताने सांगीतला ‘तो’ किस्सा

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोज्वळ दिसणारी प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आली आहे. तिची मराठी सिनेसृष्टीतील सर्वात बोल्ड वेबसिरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. (prajakta mali mother on ranbazar)

रानबाजार असे या वेब सिरिजचे नाव असून तिच्या या सिरीजमधल्या तिच्या भूमिकेमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. या वेबसिरिजमध्ये प्राजक्ता माळीने महत्वाची भूमिका साकारली आहे. प्राजक्ता या सिरीजमध्ये अतिशय बोल्ड भूमिका साकारणार आहे.

सत्य घटनांवर आधारित असलेल्या या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता माळीला तेजस्विनी पंडित साथ देताना दिसून येणार आहे.या सिरीजमध्ये दोघींनीही अतिशय बोल्ड सीन्स दिले आहे. पण यावरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. प्राजक्ता माळीने या ट्रोलिंगवर नुकतंच भाष्य केलं आहे.

प्राजक्ताने एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तिने आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच आपल्या आईची यावर काय प्रतिक्रिया होती हेही तिने सांगितले आहे. प्रेक्षकांची ही प्रतिक्रिया स्वाभाविक होती. कारण महाराष्ट्रात माझी एक वेगळी ओळख होती. हा प्रोजेक्ट स्विकारताना मला माहिती होते की, हे माझ्या चाहत्यांना खटकणार आहे, असे प्राजक्ताने म्हटले आहे

प्रोजेक्ट करताना मी त्यात कोणती भूमिका करणार आहे हे लोकांना समजलं नव्हतं. पण आता त्यांना समजलं आहे की मी कामाठीपूरामधील सेक्स वर्करची भूमिका करत आहे. पण टीझर हा वेगळा आणि सिरीज ही वेगळी आहे. तुम्ही सिरीज बघा आणि मग सांगा, असे प्राजक्ताने मुलाखतीत म्हटलं आहे.

या भूमिकेवर आईची काय प्रतिक्रिया होती? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. प्राजक्ता म्हणाली, माझी आई माझ्यापेक्षा जास्त बोल्ड आहे. ती माझ्यापेक्षा १० पावलं पुढे आहे. तिची परवानगी घेऊन मी ही वेब सिरीज केली आहे. कलाकार म्हणून तिचा मला पुर्ण पाठिंबा आहे.

तसेच ही वेब सिरीज करण्यापूर्वी मी आईची रितसर परवानगी घेतली होती. मी आईला स्पष्ट सांगितलं होतं मी स्क्रिप्ट ऐकलं ते खुप तगडं आहे. माझी भूमिका अशी अशी आहे. त्यावेळी आई मला म्हणाली होती, की आलिया भट्टचा कामाठीपुरावर एक चित्रपट येतोय जर ती करु शकते तर तु का नाही? आणि तिने मला होकार दिला, असेही प्राजक्ताने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरे पुण्यातून निघताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यालयातच भिडले नेते
राजेशाही थाटात पार पडला PSI पल्लवी जाधवचा विवाह सोहळा, जाणून घ्या तिची संघर्षकथा..
‘पवारांनी संस्कृतीवर बोलू नये, तुमची शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल’; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now