Share

रोहित यशस्वी कर्णधार ठरण्यामागे आहे ‘या’ क्रिकेटपटूचा हात; माजी क्रिकेटपटूचा मोठा गौप्यस्फोट

rohit

भारताचा नवीन कर्णधार रोहित शर्मा हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण रोहित कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाने एकही सामना हरलेला नाही, मग तो टी २० असो वा वनडे. त्याने प्रत्येक मालिकेत विजय मिळवला आहे. यामुळे तो रेकॉर्डही बनवत आहे. (pragyan ojha on rohit sharma captaincy)

रोहित शर्मा घरच्या भूमीवर सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माने या बाबतीत इऑन मॉर्गन आणि केन विल्यमसनला मागे टाकले. रोहित शर्माने भारतात १६ टी-२० सामने जिंकले आहेत, तर मॉर्गनने इंग्लंडमध्ये १५ आणि केन विल्यमसनने न्यूझीलंडमध्ये १५ सामने जिंकले आहेत.

रोहित शर्मा जेव्हापासून कर्णधार झाला आहे, तेव्हापासून भारतीय संघ एकही सामना हरलेला नाही. न्युझिलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांविरुद्ध एका पाठोपाठ मालिका विजय भारतीय संघाने मिळवले आहे. त्यामुळे रोहित शर्मा असा नक्की काय करतोय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

संवाद कौशल्य, व्यक्तीची हाताळणी, ज्युनियर्सना सन्मान देणं आणि सिनियर खेळाडूंचा योग्य पद्धतीने वापर ही रोहित शर्माची कौशल्य आहे. जे खेळाडू रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळले आहे. त्यांना त्याच्या प्रवृत्तीबद्दल माहिती आहे. त्याच्या या कौशल्यामुळे त्याला संघ सांभाळणं सोपं जातं. रोहितचा मित्र आणि क्रिकेटपटू प्रग्यान ओझाने याबाबत सांगितले आहे. दोघेही डेक्कन चार्जर्सकडून खेळत होते.

मुंबई इंडियन्सकडून खेळताना रोहित शर्माला IPL मध्ये ओळख मिळाली, पण याची सुरुवात डेक्कन चार्जर्समध्ये खेळतानाच झाली होती. याचं श्रेय एडम गिलख्रिस्टला जातं, कारण त्यानेच रोहित शर्माला उपकर्णधार बनवलं होतं. संघात सिनियर खेळाडू असतानाही एडमने रोहितची ताकद ओळखली होती.

रोहित संघाची आणि खेळाची परिस्थिती पटकन समजतो. तसेच त्यानुसार तो टीप्स देताना दिसून येतो. ज्यामुळे संघाला फायदा होतो. एखादा खेळाडू खराब खेळत असेल, तर त्याच्याकडून चांगला खेळ कसा खेळवून घ्यायचा हे रोहित शर्माला चांगले माहितीये, त्यामुळे तो चांगला कर्णधार बनला आहे, असे ओझाने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये ‘या’ संघाकडून रैनाची होणार धमाकेदार एन्ट्री, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण
देशसेवा केल्यानंतर माजी सैनिकांनी केली जिरेनियमची शेती, कमावले लाखो रुपये, वाचा यशोगाथा
बोल्ड सीन्समध्ये मर्यादा ओलांडणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले तुफान मादक फोटो, चाहते झाले पागल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now