देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले होते. दिल्लीतील बेगमपूर भागात एका दूध व्यापाऱ्यावर गोळ्या झाडल्याचा प्रकार घडला होता. आता या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. (pradip murder case delhi)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रदीपची पत्नी सीमा हिचे गेल्या ८ वर्षांपासून एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. हा प्रकार पतीला समजताच त्याने विरोध केला. त्यामुळे पत्नीने तिच्या प्रियकरासह ५ लोकांना नवऱ्याला मारण्याची सुपारी दिली. तिने सर्वांना ४ लाख रुपये दिले. यानंतर सुपारी घेणाऱ्याने रस्त्यातच दूध व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी रोजी एका व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृत प्रदीप याचा दुधाचा व्यवसाय असल्याचे तपासात उघड झाले. त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
पोलीस तपासात मृत प्रदीपची पत्नी सीमा हिचे गेल्या ८ वर्षांपासून गौरव तेतिया नावाच्या व्यक्तीसोबत अवैध प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. गौरव हा सीमाचा भाडेकरू असून खून झाल्यापासून तो घरातून पळून गेला होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आला.
त्यानंतर पोलिसांनी गौरवची शोधाशोध सुरु केली. गौरवचे लोकेशन नोएडामध्ये आढळले. पोलिसांनी गौरवला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसांनी सीमाला ताब्यात घेतले आणि गौरव आणि सीमा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये दोघांचे ८ वर्षांपासून अवैध संबंध असल्याचे उघड झाले. ही बाब नवऱ्याला कळताच तो विरोध करत होता. त्यामुळे सीमा आणि गौरवने मिळून प्रदीपची हत्या करण्याचा कट रचला होता, असे दोघांनी कबूल केले आहे.
प्रदीपला मारण्यासाठी गौरवने रिंकू, सौरभ, प्रशांत, प्रविंदर, विशन या पाच लोकांना सुपारी दिली. प्रत्येकाला चार-चार लाख रुपये देण्यात आले. प्रदीप मोटारसायकलवरून जात असताना आरोपींनी त्याच्यावर गोळी झाडली. याप्रकरणी सीमा आणि गौरवसह एकूण ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले २ दुचाकी, २ पिस्तूल आणि ६ मोबाईल जप्त केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
चीनकडून कर्ज घेऊन श्रीलंका झालाय कर्जबाजारी, पेट्रोल डिझेल घ्यायलाही नाहीत पैसै, ‘अशी’ झालीये अवस्था
प्रेमाची अजब कहाणी! 80 वर्षांचे आजोबा पडले 84 वर्षांच्या आजीच्या प्रेमात; दोघे पळून गेले मात्र….
“आमच्या मुलीला बदनाम करू नका”, दिशा सालियानच्या आईने भाजप नेत्यांना झापले