Share

प्रभासच्या ‘राधेश्याम’ चित्रपटावर कोरोनाचे सावट; निर्मात्यांनी प्रदर्शनाबाबत घेतला मोठा निर्णय

देशभरात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा अनेक निर्बंध लावण्यात येत आहे. या निर्बंधानुसार अनेक ठिकाणी सिनेमागृह पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहेत तर काही ठिकाणी ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहेत. त्यामुळे याचा परिणाम चित्रपटांवर होताना दिसून येत आहे. ही परिस्थिती पाहता अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत आहे. यामध्ये आता बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा बहुप्रतिक्षित ‘राधेश्याम’ या चित्रपटाचाही समावेश झाला आहे.

देशात कोरोनामुळे लावण्यात आलेल्या नव्या निर्बंधाचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘८३’ या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झालेला दिसून आला. या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगत अनेक निर्माते त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलत आहेत. यामध्ये सुरुवातीला शाहीद कपूरच्या ‘जर्सी’ या स्पोर्टस ड्रामा चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.

नुकतीच बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी पुढे ढकलली. त्यानंतर आता प्रभास आणि पुजा हेगडे अभिनित ‘राधेश्याम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे.

‘राधेश्याम’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट करत लिहिण्यात आले की, ‘कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे आम्हाला ‘राधेश्याम’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागत आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि प्रोत्साहनासाठी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. लवकरच आम्ही तुम्हाला सिनेमागृहात भेटू’.

याशिवाय अभिनेत्री पूजा हेगडेनेही तिच्या ट्विटर हँडलवर पोस्ट शेअर करत चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, ‘राधेश्याम’ हा चित्रपट १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. प्रभासचे चाहते या चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, आता चाहत्यांना थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

माझ्या आजोबांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती, त्यातच त्यांचा मृत्यू झाला; ट्रोलर्सना जावेद अख्तरांचे सडेतोड उत्तर
अमीषा पटेलला या काँग्रेस नेत्याचा मुलगा म्हणाला, माझ्यासोबत लग्न करणार का? अमीषा पटेल म्हणाली..

एवढ्या थंडीत दिशा पटानीने समुद्राच्या पाण्यात क्लिक केला फोटो, नेटकरी म्हणाला, ‘कोणतं च्यवनप्राश खातेस’

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now