Share

आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा अचानक मृत्यू, बायकोनं सांगितलं नेमकं काय घडलं

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कार्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात अडकल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. तपासात अनेक धागेदोरे सापडत असल्याने हे प्रकरण अधिक गाजले. अशातच एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यु झाल्याची बातमी समोर आली आहे. (prabhakar sail death incident)

शुक्रवारी प्रभाकर साईलचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी त्याला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्याचे निधन झाले. पण त्याचा मृत्यु संशयास्पद असल्याचेही म्हटले जात होते. त्यानंतर त्याच्या पोस्ट मार्टमचा रिपोर्ट आला असून त्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे.

असे असताना आता प्रभाकरच्या मृत्युबाबत त्याची पत्नी पूजाने प्रतिक्रिया दिली आहे. प्रभाकरचा मृत्यु नैसर्गिक असल्याचे पूजाने सांगितले आहे. यावेळी पूजाने प्रभाकरच्या मृत्युचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. त्याचा दवाखान्यात मृत्यु झाला असून आम्ही त्याचे सीसीटीव्ही फुटेजही पाहिले आहे, असे पूजाने म्हटले आहे.

ते स्वत: रुग्णालयात चालत गेले होते. त्यांचा ECG काढला गेला. त्यानंतर त्यांना ऍडमिट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मग ते चंद्रा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांना नंतर अटॅक आला आणि पाच मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यु झाला. आम्हाला त्याचे सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले. त्यांचा मृत्यु नैसर्गिक आहे. यात काहीच शंका नाही, असे पूजाने म्हटले आहे.

दरम्यान, प्रभाकर साईलच्या मृत्युबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. अनेकांना त्यांच्या निधनाची शंका होतीच आणि एवढ्या धडधाकट माणसाचे अचानक हृदयविकाच्या झटक्याने निधन कसे झाले? असा सवाल दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे

प्रभाकर साईलने मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी माध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे केली होती,असा दावाही प्रभाकर साईलने केला होता.

महत्वाच्या बातम्या-
राजकुमार रावची झाली फसवणूक, स्वतःच पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला, कोणीतरी माझ्या नावावर..
अभिनेता राजकुमार रावच्या नावावर भलत्यानेच घेतलं कर्ज, पॅनकार्डचा वापर करत घातला गंडा, अभिनेताही झाला हैराण
‘दिलेली शिक्षा भोगायला तयार’ ऑस्करमधील वादानंतर विल स्मिथचं मोठं पाऊल, ‘या’ संस्थेतून झाला पायउतार

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now