सध्या राजकीय वर्तुळात एका पोस्टरची जोरदार चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात सध्या घडामोडींना वेग आला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींत आता कोकणातून एका बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बॅनर चक्क मनसेकडून लावण्यात आलं आहे.
हा बॅनर मनसेचे सरचिटणीस असलेल्या वैभव खेडेकर यांनी लावला आहे. ‘कोकणची भूमी निष्ठावंतांची, गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा, अशा आशयाचा हा बॅनर आहे. सध्या राजकीय वर्तुळात याच बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे, ‘ठाकरे ब्रँड वाचवा’ हे ठळक भगव्या अक्षरांत लिहिलं आहे.
शिनसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यात मनसेकडून करण्यात आलेल्या या बॅनर बाजीने आणखी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र यावर अद्याप मनसेचे कोणत्याच नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
तर दुसरीकडे आता पुन्हा एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गट मागे हटायला तयार नाहीत. त्यांनी आता आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. शिंदे गटाने आपल्या गटाचं नाव ठरवलं आहे अशी माहिती माध्यमांमध्ये आली आहे. शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे ठेवले आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, जर तुम्हाला वेगळा गट स्थापन करायचा असेल तर खुशाल करा पण बाळासाहेबांचं किंवा ठाकरे हे नाव वापरायचं नाही. शिवसेना हे नाव वापरायचं नाही.
ठाकरे हे नाव व लावता जगून दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. पण तरीही एकनाथ शिंदेंनी त्यांच्या गटाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव दिले आहे. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. आधीच बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
‘बंडखोर आमदारांना जेवणातून गुंगीचे औषध दिलं जातयं’, राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप
बाळासाहेबांचे नाव वापरता येणार नाही, शिवसेना निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवणार; शिंदे गटाला मोठा धक्का
दादा भुसेंनी शिवसेनेत राहून ४० वर्षात जे कमावलं ते बंडात सामील होऊन मातीत घातलं
एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं; ३८ आमदार जमवूनही स्वतंत्र गट स्थापन करता येणार नाही