Politics: खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा नवी मुंबईतील एका मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी एक मोठी दुर्घटना घडली. खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला काही मागण्या केल्या आहेत.
खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेचे खापर विरोधकांनी सत्ताधारी पक्ष आणि आयोजकांवर फोडले आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. त्याचवेळी सरकारवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेचा दोष निसर्गाला देण्यात आला आहे. पण विरोधकांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. या दुर्घटनेत अनेकांचा बळी गेला असून १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल उघडकीस आला आहे. या अहवालात मृत्यूचे कारण समोर आले आहे. त्यामुळे चर्चेंना उधाण आला आहे.
खारघरमध्ये नेमकं घडलं काय?
खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी लाखो लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. या सोहळ्याची वेळ दुपारची ठेवण्यात आली होती. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात लोकांना ७ ते ८ तास तळावं लागलं. यादरम्यान उष्माघातामुळे १४ जणांनी उपचारादरम्यान आपला जीव गमावला आहे.
या दुर्घटनेला शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरलं जात आहे. तर राजकीय वर्तुळातून नेते मंडळी अनेक दावे करत आहे. नुकतेच अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारकडे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना २० लाखांची आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. तर जखमींना ५ लाख रुपये द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मंत्री शंभूराजे देसाई आणि उदय सामंत यांनीही आपल्या भूमिका स्पष्ट केले आहेत.
उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या १४ लोकांचा शवविच्छेदन अहवाल सादर करताना डॉक्टर म्हणाले की, मृत्यू झालेल्या लोकांच्या शरीरात पाण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. तसेच, मृत्यूमुखी पडलेल्या १४ जणांपैकी १२ जणांच्या पोटात अन्नाचा एकही कण नसल्याचे अहवालात समोर आले आहे. तर इतर दोन जणांनी खाल्लं होतं की नाही यासंदर्भात अद्यापही माहिती स्पष्ट झालेली नाही. उन्हात कातडी जळेपर्यंत बसून राहिल्यामुळे शरीरात पाण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
राज्यात लवकरच राजकीय भूकंप! ३५ वर्षे आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात खळबळ
‘सत्तेच्या नशेत भावना पण मेल्या आहेत’; उष्माघाताने लोकांचे जीव जात असताना सत्ताधाऱ्यांचे शाही जेवण
बॉलिवूडमधील सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण? रविंद्र जडेजाने सांगीतलेल्या नावाने टीम इंडियात राडा